‘ब्रह्मसखी’तर्फे रविवारी (ता. ६)
खास उपवधू-वरांचा ‘प्रत्यक्ष संवाद’
पुणे: ब्रह्मसखी ब्राह्मण महिला वधुवर मंडळातर्फे खास उपवधू-वरांसाठी ‘प्रत्यक्ष संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता. ६) सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत घरकुल लाॅन्स, डीपी रस्ता, एरंडवणे, पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमात विवाहोच्छूक वधू-वर सहभागी होणार आहेत. ब्रह्मसखी आयोजित ‘प्रत्यक्ष संवाद’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी व देणे समाजाचे संस्थेच्या संस्थापिका वीणा गोखले यांच्या हस्ते होणार आहे.
वधू-वरांसाठी असे वैविध्यपूर्ण उपक्रम ब्रह्मसखीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे राबविले जात आहे. यावेळी प्रत्यक्ष संवाद या नावाने हा उपक्रम ब्रह्मसखी घेत आहे. ब्राह्मण समाजातील उपवर-वधुंचे विवाहयोग जुळून यावेत म्हणून नंदिनी ओपलकर, गीता सराफ, ज्योती कानोले, तृप्ती कुलकर्णी या चौघी मैत्रिणींनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आजवर हजारो वधू-वरांचे विवाहयोग जुळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यासह ब्रह्मसखीने समाजातील गरजूंना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. मुलामुलींचे मन परिवर्तन होऊन त्यांचे विवाहयोग कसे जुळून येतील? यासाठी ब्रह्मसखी कायम झटत असते, यापुढेही ब्रह्मसखीचे असेच काम सुरू राहील, असा विश्वास ‘ब्रह्मसखी’च्या चौघी संचालकांनी व्यक्त केला.