पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी समुपदेशन व मानसिक आधार देण्याचे काम करणाऱ्या कनेक्टिंग ट्रस्ट संस्थेतर्फे ‘लिसनिंग टू द व्हाईसेस ऑफ वुमेन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. २९ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत अरोरा टॉवर्स, एम. जी. रोड पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी थरमॅक्स ग्रुपच्या चेअरपर्सन मेहेर पदमजी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी होणाऱ्या चर्चासत्रात समाजवादी महिला सभेच्या विश्वस्त ऍड. अर्चना मोरे, माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लूसी कुरियन, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख, एकेएस फाउंडेशनच्या संस्थापिका बरखा बजाज व पुणे टाइम्स मिरर-सिव्हिक मिररच्या मुख्य संपादिका कोरिना मॅन्युअल आपले विचार मांडणार आहेत.
कनेक्टींग ट्रस्ट ही संस्था आत्महत्या प्रतिबंधासाठी जागृती कार्यक्रम, परस्पर संवाद, सर्वायवर सपोर्ट प्रोग्रॅम व एक हेल्पलाइन चालवते. इथे कोणीही पारखत नाही, सल्ला देत नाही किंवा माहिती उघड करत नाही. सहभावनेतुन तुम्हाला ऐकले जाते. कोणताही सल्ला दिला जात नाही. मनमोकळेपणाने व्यक्त होता येते. ही हेल्पलाईन सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत मोफत सेवा देते. ९९२२००४३०५ /९९२२००११२२ यावर संपर्क करू शकता. अथवा, distressmailsconnecting@gmail.com वर लिहून व्यक्त होऊ शकता. प्रत्यक्ष भेटीसाठी ८४८४०३३३१२ वर संपर्क साधून वेळ घेता येते.