पुणे दि. २३ – लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) तर्फे स्वातंत्र्य दिन, एलपीएफ प्रभावाची ३० वर्षे व इन्स्पिरा न्यूजलेटरची ६५ वी आवृत्ती प्रकाशित करणे आणि रक्तदान शिबिर असे चार कार्यक्रम एकत्रित झाले. (Leela Poonawalla Foundation (LPF) organized four events: Independence Day, 30 years of LPF impact, publication of the 65th edition of the Inspira Newsletter, and a blood donation camp.) हे कार्यक्रम बाणेर येथील भारती विद्यापीठाच्या रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स येथे पार पडले.
अॅक्सिस बँक (पीबी शाखा) आणि भारती विद्यापीठ रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्यान आयोजित केले असून समारंभाला ‘एलपीएफ’च्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनावाला, संस्थापक विश्वस्त फिरोज पूनावाला, अॅक्सिस बँकेचे क्लस्टर प्रमुख व वरिष्ठ उपाध्यक्ष-१ भूषण वैद्य, प्राचार्य डॉ. भाग्यश्री व शर्मिला गोवंडे उपस्थित होते.
यावेळी १०० हून अधिक जणांनी रक्तदान केले. ‘एलपीएफ’चे संस्थापक विश्वस्त पूनावाला म्हणाले, “दान केलेला रक्ताचा प्रत्येक थेंब हा जीवनाची देणगी आणि गरजूंसाठी आशेचा किरण आहे.”