केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी पुण्यातील ॲड. कृपाल पलूसकर यांची निवड

केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी पुण्यातील ॲड. कृपाल पलूसकर यांची निवड

केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी
पुण्यातील ॲड. कृपाल पलूसकर यांची निवड
 
पुणे : डॉ. के. टी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मध्य रेल्वेचे  उपमहाप्रबंधक पियूष कांत चतुर्वेदी व सहायक उपमहाप्रबंधक अमित कुमार मंडल यांनी दिले. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ही निवड असणार आहे.

ॲड. पलुसकर यांचे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांना सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, याचीच दखल घेऊन रेल्वे समितीने त्यांना सदस्यपदी काम करण्याची संधी दिली. त्यांच्या या निवडीबाबत शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, वकील व सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

या निवडीबद्दल ॲड. पलूसकर यांनी आनंद व्यक्त करत येणाऱ्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सुखसुविधा व रेल्वेच्या प्रगतीसाठी सातत्याने कृतिशील कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले आहे. या समितीवर महाराष्ट्र राज्यातून माझी वर्णी लागली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. माझ्यावर दिलेली जबाबदारी सकारात्मक कामे करत पार पाडेल. 

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *