झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

पुणे: महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून १.८५ कोटी इतके नवोदित मतदार मतदान करणार आहेत. मतदान पॅनेल शहरी मतदानात वाढ करण्यासाठी विशेष मोहीम राबवेल. ज्यामध्ये ८५ वर्षावरील वृद्ध हे घरूनच मतदान करू शकणार आहेत. यासाठी त्यांना १२D अर्ज भरणे आणि नोंदणी करणे आवश्यक असेल. मतदान केंद्रावर मतदान रंगेमध्ये बाक व खुर्च्यांची व्यवस्था केलेली असेल जेणे करून वृद्धांचा हा मतदानाचा अनुभव अधिक सुलभ होईल.महाराष्ट्रात १,००,१८६ मतदान केंद्रे असतील. ‘वोटर हेल्पलाईन’ या अँप्लिकेशनवा आपण आपले मतदान केंद्र आणि इतर गोष्टींची माहिती घेऊ शकतो. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे, तर ३० ऑक्टोबरला अर्ज छाननी केली जाईल, अर्जदार आपले अर्ज ४ नोव्हेंबर पर्यंत मागे घेऊ शकणार आहेत.

महाराष्ट्रातील नांदेड जिल्यात लोकसभेच्या जागेसाठी सुद्धा मतदान होणार आहे. वसंतराव चव्हण यांच्या अचानक जाण्यानं ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *