देखाव्यातून साकारली विसर्जन मिरवणूक ग्रंथ रथ व मूषक वाद्य पथकाने वेधले लक्ष; जेधे यांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

देखाव्यातून साकारली विसर्जन मिरवणूक ग्रंथ रथ व मूषक वाद्य पथकाने वेधले लक्ष; जेधे यांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

 
 
पुणे, दि. ५ – पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की, देखाव्यांची परंपरा आलीच. मग त्यामध्ये हालते देखावे, जिवंत देखावे, धार्मिक, प्रबोधनात्मक, सामाजिक आदी विषयांवर देखावे सादर करण्याची, तसेच भव्य विसर्जन मिरवणुकीची मोठी परंपरा आहे. घरगुती गणेशोत्सवही याला अपवाद नाही. सुभाषनगरमधील जेधे कुटुंबाने(subhashnagar jedhe family) असाच एक अफलातून देखावा सादर केला आहे.
 
देखाव्यातून पुण्याच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक शुक्रवार पेठेतील कान्होजी जेधे यांच्या घरी साकारली आहे. ग्रंथांनी सजवलेला आकर्षक रथ व त्यापुढे वादन करणारे मूषक वाद्य पथक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. लहान मूर्तींच्या प्रतिकृतीतून देखावा साकारण्याची परंपरा जेधे यांनी याही वर्षी कायम राखली आहे. (The attractive chariot decorated with scriptures and the musical group playing in front of it is attracting everyone’s attention. Jedhe has continued the tradition of creating a scene using replicas of small idols this year too.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *