रोजगारनिर्मितीसह भारताच्या आर्थिक विकासालाचालना देण्यासाठी ‘इनटेवा’चा पुढाकार: जेरार्ड रूस

रोजगारनिर्मितीसह भारताच्या आर्थिक विकासालाचालना देण्यासाठी ‘इनटेवा’चा पुढाकार: जेरार्ड रूस

इनटेवा प्रोडक्टसच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन; २८ कोटींची गुंतवणूक, १०० नोकऱ्यांची उपलब्धता

पुणे: ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि घटकांमध्ये जागतिक स्तरावर अग्रणी असलेल्या इनटेवा प्रोडक्ट्स कंपनीने पुण्यातील चाकण येथील उत्पादन प्रकल्पाचा विस्तार केला आहे. या प्रकल्पाच्या विस्तारासाठी ३.३ मिलियन डॉलरची (जवळपास २८ कोटी रुपये) गुंतवणूक केली असून, स्थानिक तरुणांसाठी १०० पेक्षा अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. रोजगारनिर्मितीसह भारताच्या आर्थिक विकासात भर टाकण्यासाठी इनटेवा प्रॉडक्ट्सने नेहमीच पुढाकार घेतला आहे, असे इनटेवा प्रोडक्ट्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेरार्ड रूस यांनी सांगितले.

चाकण येथील इनटेवा इंडियाच्या विस्तारित उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी रूस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी इनटेवा प्रोडक्ट्सचे उपाध्यक्ष आणि चीफ कमर्शियल ऑफिसर मार्को वोम वेगे, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कटारिया आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जेरार्ड रूस म्हणाले, “भारतात वेगाने विस्तारणाऱ्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील मागण्या पूर्ण करण्यासाठी हा विस्तार महत्वाचा आहे. यामुळे उत्पादन निर्मितीचे क्षेत्र ७० टक्क्यांनी वाढणार आहे. आता प्लांटचे क्षेत्र ८५ हजार चौरस फूट इतके झाले आहे. विस्तारित उत्पादन क्षेत्राव्यतिरिक्त, सुविधेमध्ये अतिरिक्त २६ हजार चौरस फूट जागेत कार्यालयीन कामकाज चालेल. विंडो रेग्युलेटर, लॅचेस आणि विंडो रेग्युलेटर मोटर आदी उत्पादने येथे बनवली जातात. कंपनीला आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी आणि भारतात पुरवठा साखळी क्षमता वाढवण्यासाठीही याची मदत होईल.”

“या विस्तारामुळे पुण्यात १०० हुन अधिक नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्याचा थेट फायदा स्थानिक तरुणांना होणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक वाढीलादेखील याचा हातभार लागेल. हा विस्तार भारतीय बाजारपेठेसाठी इनटेवाची ग्राहकांशी असलेली वचनबद्धता प्रतिबिंबित करतो, जी कंपनीच्या जागतिक वाढीच्या धोरणासाठी महत्त्वाची आहे, उच्च-गुणवत्तेच्या ऑटोमोटिव्ह घटकांची मागणी सतत वाढत आहे, स्थानिक रोजगार संधी निर्माण करण्या बरोबरच आमच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याची आमची क्षमता आहे याचा आनंद आहे,” असेही रूस यांनी नमूद केले.

संजय कटारिया म्हणाले, “इनटेवाचा पुण्यातील प्रकल्प महिंद्रा आणि टाटा मोटार्स, स्टेलांटिस, फोक्सवॅगन, ह्युंडाई, एमजी मोटर्स आणि फोर्स मोटर्स, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील बाजारपेठेत विंडो रेग्युलेटर मोटर्सना आपले उत्पादन निर्यात करून जागतिक ऑटोमोटिव्ह पुरवठा साखळीसाठी हा प्लांट महत्त्वपूर्ण पुरवठादार म्हणून काम करत आहे. या विस्तारामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या विकसनशील गरजा पूर्ण करणारे आणि अधिक उच्च दर्जाचे ऑटोमोटिव्ह घटक पुरवण्यास अधिक सक्षम होत आहोत.”

इनटेवा प्रोडक्ट्स नाविन्यपूर्ण, विश्वासार्ह, पर्यावरणपूरक उत्पादने देणारा अग्रगण्य जागतिक ऑटोमोटिव्ह पुरवठादार आहे. इनटेवाकडे डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि क्लोजर सिस्टम्स, इंटिरियर सिस्टम्स आणि मोटर्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी जागतिक संसाधने आहेत. इनटेवाची स्थापना नाविन्यपूर्ण उपाय आणि मूल्य-आधारित उपाय चालविण्यासाठी करण्यात आली. कंपनी ३० साइट्समध्ये ८,००० हून अधिक लोकांना रोजगार देते. ट्रॉय, मिशिगन (यूएसए) येथे कंपनीचे जागतिक मुख्यालय आहे, असे वेगे यांनी सांगितले.

 

इनटेवा प्रोडक्ट्सबद्दल:
इनटेवा प्रोडक्ट्सने २००८ मध्ये पुण्यात प्रथम प्रकल्प सुरू केला. हाच प्रकल्प २०१२ मध्ये चाकण येथील ग्रीनफिल्ड प्लांटमध्ये स्थलांतरित झाला. तेव्हापासून, कंपनीने गुणवत्ता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणावर भर देऊन उच्चदर्जाचे ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स वितरीत करण्यासाठी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. इनटेवा बेंगळुरूमध्ये एक तांत्रिक केंद्र म्हणून देखील काम करते. ज्यामध्ये अंदाजे ३२० कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यात १८१ अभियंते असून, प्रगत उत्पादन विकास आणि अभियांत्रिकी कौशल्यासह जागतिक आणि भारतीय दोन्ही आव्हानांचा ते सामना करतात. भारतीय ऑटोमोटिव्ह बाजारपेठ वाढत असताना, देशांतर्गत आणि जागतिक ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण व उच्च-गुणवत्तेच्या घटकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी इनटेवा धोरणात्मकदृष्ट्या कार्यरत आहे. कंपनीची भारतातील गुंतवणूक ही जागतिक ऑटोमोटिव्ह घटकांची पुरवठा साखळी आणि स्थानिक अर्थव्यवस्था या दोन्हींना हातभार लावत जागतिक स्तरावर एक व्यापक बाजरपेठ तयार करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *