पुणे : भारतीय स्टेट बँकेच्या आर.ए.सी.पी.सी.-१ च्या शंकरशेठ रोडवरील नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) झाले. भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक (महाराष्ट्र सर्कल) अजयकुमार सिंग आणि मुख्य महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट सेंटर) महेश गोयल यांच्या उपस्थितीत या नूतन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक (महाराष्ट्र सर्कल) सुखविंदर कौर, कार्पोरेट सेंटर मुंबईचे महाव्यवस्थापक सत्यप्रकाश ए. जी., विभागीय कार्यालय पुणेचे उपमहाव्यवस्थापक जगन्नाथ साहू, उपमहाव्यवस्थापक (महाराष्ट्र सर्कल) श्रीमती अर्विन भटनागर आणि आर.ए.सी.पी.सी.-१ चे सहाय्यक महाव्यवस्थापक सुरजीत साह आदी उपस्थित होते.
उद्घाटनावेळी बोलताना अजयकुमार सिंग म्हणाले, “देशातील प्रमुख बँक म्हणून ग्राहकांना चांगली सेवा देण्याची परंपरा स्टेट बँकेने यापुढेही कायम ठेवावी. विविध प्रकारची कर्जे, सेवा देत बँकेने विश्वसनीय बँक नाव मिळवलेले आहे. या नूतन वास्तूमधून ग्राहकांना आणखी दर्जेदार सुविधा मिळतील.”
“आर.ए.सी.पी.सी.-१ ने आजवर उत्तम सेवा दिलेली आहे. त्यामुळे भारतभरात या शाखेचे नाव व्यवसायाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. या नव्या इमारतीतून आणखीन चांगली सेवा आणि विविध योजनांतून ग्राहकांना लाभ देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे सुरजीत साह यांनी सांगितले.