रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजचा पदग्रहण समारंभ

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजचा पदग्रहण समारंभ

समाजपरिवर्तनात ‘रोटरी’चे योगदान मोलाचे;
डीजीएन नितीन ढमाले यांचे मत
 

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. कुणाल बन्सल, सचिवपदी बाल-दंतरोग तज्ज्ञ डॉ. रिचा बन्सल, तर खजिनदारपदी सचिन तलरेजा यांची निवड झाली आहे. २०२४-२५ या कालावधीकरिता नव्या कार्यकारिणीची निवड करत त्यांचा रोटरी क्लबचे नामनिर्देशित प्रांतपाल (डीजीएन) नितीन ढमाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यकारिणीमध्ये डॉ. सिमरन जेठवानी (कार्यकारी सचिव व प्रांत समिती), रवी पतोडीया (उपाध्यक्ष), प्रथमेश चौधरी (संचालक-फाउंडेशन), जीवराज चोले (संचालक-पब्लिक इमेज), खुशबू काकरानिया (संचालक-मेंबररशिप), राजू शहा (संचालक-सेवा प्रकल्प) यांचा समावेश आहे. ज्येष्ठ समाजसेवी डॉ. रमेश बन्सल, डॉ. शिव गुप्ता व २२ व्या वर्षी आयपीएस झालेल्या सिद्धार्थ भांगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रसंगी असिस्टंट गव्हर्नर असीस रे, असिस्टंट लर्निंग फॅसिलिटेटर पल्लवी साबळे उपस्थित होते. प्रथमेश आबनावे, सारिका रोजेकर, गणेश चप्पलवार, विहंगा भोसले या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यात आली.

२०२३-२४ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्लबचे अभिनंदन करत नितीन ढमाले यांनी सामाजिक कार्याचे हे उपक्रम यापुढेही असेच जोमाने सुरु ठेवावेत. या सामाजिक उपक्रमांत रोटरी प्रांत विभागाकडून लागणारे सर्व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, वृद्धसेवा, महिला सुरक्षा, पर्यावरण संवर्धन अशा सर्वच क्षेत्रात तुम्ही करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
 
याआधीच्या कार्यकारिणीने सुरु केलेले समाजोपयोगी प्रकल्प अधिक विस्ताराने करण्याचे, तसेच नवीन प्रकल्प राबविण्याचे ध्येय असल्याचे डॉ. कुणाल बन्सल यांनी सांगितले. डॉ. सिमरन जेठवानी यांनी क्लबच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी क्लबच्या ‘स्पॉटलाईट’ या न्यूजलेटरचे प्रकाशन करण्यात आले. रवी पतोडीया यांनी आभार मानले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *