मुंबई : येत्या नवीन वर्षाला वाढत्या महागाईचा फटका बसणार असून सुरुवातीलाच सलून दरामध्ये 20 ते 30 टक्के भाववाढ होणार आहे. सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दत्तात्रय चव्हाण, महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रसाद चव्हाण , मुंबई अध्यक्ष श्री.तुषार चव्हाण , महाराष्ट्र प्रभारी श्री. उदय टक्के यांनी भाववाढीचा निर्णय जाहीर केला आहे.
नव्या दरवाढीनुसार, शहरी भागासाठी केशकर्तनासह दाढीसाठी व इतर सौंदर्य प्रसाधन कामासाठी 20 ते 30 टक्के ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत तर ग्रामीण भागासाठी हिच दरवाढ 15 ते 20 टक्के असेल. नवीन दरवाढ लक्षात घेऊन ग्राहकांनीही सहकार्य करावे असे आवाहन सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे करण्यात आले आहे.
कोरोना काळात मागील तीन वर्षात सलून व्यवसायिकांनी कोणतेही दर वाड केली नाही त्यात कच्चा माल, वीज, पाणी आणि कामगारांच्या पगारात वाढ झाल्यामुळे नाईलाजाने सलून दरात वाढ करावी लागली. तसेच जीएसटी दरात देखील उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून स्थिर असलेले सलूनचे दर 1 जानेवारी 2025 पासून वाढविण्यात येणार आहेत. असे सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बंधू चव्हाण यांनी सांगितले.