मुसळधार पाऊस आणि पुर यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.महाड,पोलादपूर येथे महापूरामुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे.नागरिकांना मदत पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न चालु आहेत.
.
पूरग्रस्तांना तात्काळ अन्न,पाणी पुरविण्यासाठी रोहा तहसीलदार सौ. कविता जाधव यांनी मदतकार्य चालु केले आहे. त्याप्रमाणे त्यांनी सुदर्शन सी.एस.आर फौंडेशन यांना मदतीचे आवाहन केले,तहसीलदार मॅडम यांच्या आवाहनास साद देत,सुदर्शनने बिस्कीट,पाणी अशी वस्तूरुपी तात्काळ मदत तहसील कार्यालय रोहा यांच्याकडे सुपूर्द केली,तसेच त्वरित सदरची मदत तहसीलदार मॅडम यांच्या सुचनेनुसार पूरग्रस्तांकडे रवाना करण्यात आली.
