सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात हिंदू रक्षा मोर्चा
पुणे : बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा जाहीर निषेध म्हणून आज आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून पुणे शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आला. हिंदू समाजाने हिंदू समाजासाठी काढलेला हा मोर्चा गंज पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीम पासून निघालेला मोर्चा मिठगंज पोलीस चौकी, शितलादेवी चौक, सोन्या मारुती चौक, पासोड्या विठोबा मंदिर चौक करत करत संत नामदेव महाराज चौकात या मोर्च्याची सांगता झाली.
सकल हिंदू समाजाच्या वतीने जागोजागी बांग्लादेश विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी बांगलादेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच मानवाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे व बांग्लादेश मध्ये हिंदू धर्मियांवर होणारे अत्याचार थांबावेत आणि धर्माच्या आधारावर बांग्लादेशातील हिंदूंवर अमानुषपणे हिंसाचार होतोय, महिला, लहान मुले देखील याला बळी पडत आहेत. भारतात राहणारे बांग्लादेशी आज भारतात सुरक्षित रहात आहेत परंतु बांग्लादेशात आज हिंदू सुरक्षित नाही, हा अन्याय भारतात राहणारा हिंदू कधीच खपवून घेणार नाही. यासाठी हा शांतता मोर्चा काढण्यात आल्याचे सकल हिंदू मोर्चाचे स्वप्निल नाईक यांनी सांगितले. बांग्लादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी भारत सरकारने सशक्त पावले उचलली पाहिजेत, आणि हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला. शेकडो नागरिकांचा या मोर्चात सहभागी झाले होते. जय श्री राम , भारत माता की जय, अशा घोषणा मोर्च्यात सहभागी लोकांनी दिल्या. हा मोर्चा जरी शांततेत काढला गेला असला तरी बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले नाहीत तर लवकरच सकल हिंदू समाज ठोक मोर्चा काढेल असे आयोजकांनी सांगितले.