राज्यपाल जिष्णू देव वर्मा, स्वामी विज्ञानानंद यांचे प्रमुख मार्गदर्शन
पुणे, दि. १२ – हिंदू इकॉनॉमिक फोरम (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे ‘एचईएफ पुणे इकॉनॉमिक कोलोक्वियम २०२५’, उद्योजकता परिषदेचे आयोजन (Hindu Economic Forum (HEF) Pune District Chapter organizes ‘HEF Pune Economic Colloquium 2025’, Entrepreneurship Conference) करण्यात येत आहे. येत्या मंगळवारी (ता. १४) सायंकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा), बाणेर रस्ता पुणे येथे ही परिषद होणार आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरमचे संस्थापक व ग्लोबल चेअरमन परमपूज्य स्वामी विज्ञानानंद प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतील, अशी माहिती ‘एचईएफ’ पुणेचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सचिव शुभम कातंगळे, खजिनदार जयेश मीना, सहसचिव राहुल जोशी उपस्थित होते.
(Gaurav tripathi said)गौरव त्रिपाठी म्हणाले, “दूरदर्शी नेते, उद्योगपती, उद्योजक, धोरणकर्ते आणि विचारवंत यांना एका व्यासपीठावर आणत, ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय ध्येयाच्या दिशेने भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्याचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्याचा या संमेलनाचा उद्देश आहे. आर्थिक विकास, संस्थात्मक क्षमता-वृद्धी आणि औद्योगिक नवोन्मेष यांसाठी रूपांतरणशील धोरणांवर विचार-विनिमय करून पुण्याला ‘विकसित भारत निर्माण’ मोहिमेत आदर्श शहर म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रमुख ध्येय आहे.”
राज्यपाल व स्वामी विज्ञानानंद यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर ‘भारताची आर्थिक शक्ती घडवणे – लोकल टू ग्लोबल’ आणि ‘बदलत्या भू-राजकीय परिदृश्यात संरक्षण व हवाई क्षेत्रातील संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये बीव्हीजी इंडियाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, पिट्टी एन्टरप्रायजेसचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पिट्टी, चितळे ग्रुपचे वर्किंग पार्टनर गिरीश चितळे, पाहवा मेटलटेकचे व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार पाहवा, अलिकॉन कास्टालोय लिमिटेडचे स्ट्रॅटेजिक बिझनेस डेव्हलपमेंट हेड व ‘एमसीसीआयए’च्या डिफेन्स कमिटीचे सदस्य हर्षवर्धन गुणे सहभागी होणार आहेत, असे गौरव त्रिपाठी यांनी नमूद केले.