सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्य व स्मार्टनेस यशाची गुरुकिल्ली; स्नेहल नवलखा

सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्य व स्मार्टनेस यशाची गुरुकिल्ली; स्नेहल नवलखा

सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्य व स्मार्टनेस यशाची गुरुकिल्ली
स्नेहल नवलखा यांचे मत; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा दीक्षांत सोहळा उत्साहात

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या वतीने २०२१-२०२४ या तुकडीचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्राचार्या डॉ. सायली पांडे, उपप्राचार्या रेणुका घोसपुरकर, विभागप्रमुख पूजा विश्वकर्मा यांच्यासह शिक्षिका खुशबू गजबी, शिखा सारडा, मोनिका कर्वे, अखिला मुरमट्टी, बीएस्सी फॅशन डिझाईनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा दीक्षांत सोहळा आयोजिला होता. आपल्या संदेशात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “शिक्षणाचे उद्दिष्ट आपल्याला नव्या कल्पनांसाठी आपले मन खुले करण्याची क्षमता देणे आणि त्याचबरोबर आपली स्वतःची ओळख विकसित करणे हे आहे. आता तुम्ही स्पर्धेने भरलेल्या खुल्या बाजारात आला आहात, परंतु मला तुमच्या यशस्वी करिअरचा नक्की विश्वास आहे.”

स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थ्यांना संस्था, शिक्षक आणि विद्यापीठाबद्दल ‘कृतज्ञतेची’ भावना जोपासण्याचे आवाहन केले. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देत यशाची गुरुकिल्ली म्हणजे कष्ट आणि स्मार्ट काम असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनुश्री देशमुख आणि लावण्या मोडक यांच्या स्वागतपर भाषणाने सोहळ्याची सुरुवात झाली. प्राचार्या डॉ. सायली पांडे यांनी विद्यार्थ्यांना यश आणि उपयुक्त जीवन कसे जगावे या विषयांवर प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप झाला.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *