महायुतीने एकदिलाने काम केल्याचा आनंद : गौरव साईनकर

महायुतीने एकदिलाने काम केल्याचा आनंद : गौरव साईनकर

हेमंत रासने मोठ्या मताधिक्याने निवडून येणार
 
पुणे: कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात भाजपने घटक पक्षातील आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाने सहभागी करून घेतले. महिनाभर महायुतीने एकदिलाने प्रचाराचे काम केल्याचा आनंद वाटतो, अशी भावना शिवसेनेचे उपशहरप्रमुख गौरव साईनकर यांनी व्यक्त केली. महायुतीचे उमेदवार हेमंत रासने प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
 
शिव कामगार सेनेचे सुधीर कुरुमकर, शिवसेना अल्पसंख्याक शहरप्रमुख विल्सन ओहोळ, समन्वयक गणेश काची, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश जगताप, भाजपचे सरचिटणीस अमित कंक, मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, आकाश गायकवाड, अतुल कच्छावे, संतोष कांबळे, ऋषिकेश वाघ आदी उपस्थित होते.
 
गौरव साईनकर म्हणाले, “हेमंत रासने कामाचा माणूस आहे. सलग चारवेळा नगरसेवक असलेल्या रासने यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना, कोरोनाच्या काळात केलेली कामे सर्वश्रुत आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही सर्व एका विचाराने, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने, जनतेच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून सर्व पदाधिकारी मोठ्या उत्साहाने प्रचार करीत होते. यावेळी हेमंत रासने मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि आमदार म्हणून कसब्याचा सर्वांगीण विकास करतील, असा विश्वास आम्हाला सर्वाना आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *