‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून वारकऱ्यांची सेवा

‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून वारकऱ्यांची सेवा

 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ग्रीन सोल्युशन्स यांच्यातर्फे आयोजन
 
पुणे, दि. २५-  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ग्रीन सोल्युशन्स यांच्यातर्फे ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यातून नुकताच पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. यावेळी पुण्यात ग्रीन सोल्युशन्सच्या वतीने १२ हजार बिस्कीट, पाणी बॉटल, राजगिरा व गुडदाणी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांना पर्यावरणपूरक शुभेच्छा देण्यात आल्या.
 
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी बाबासाहेब कुकडे, (  Maharashtra Pollution Control Board Divisional Officer Babasaheb Kukde)     उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रीन सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे व आरती भोसले-अहिवळे यांच्या मार्गदर्शनात संचालक अमित देशपांडे, मुख्य अधिकारी रविशंकर गोरवे व ग्रीन सोल्युशन्सचे कर्मचारी, स्वयंसेवकांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.
 
प्लास्टिकचा वापर टाळून धरतीला प्लॅस्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्याचे आवाहन बाबासाहेब कुकडे यांनी केले.  (Babasaheb Kukde appealed to free the earth from the scourge of plastic by avoiding the use of plastic. )  वारी म्हणजे प्रेम, भक्ती व आपुलकीचा संगम असून, पर्यावरणाचे रक्षण करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सागर अहिवळे म्हणाले, “ही केवळ एक वारी नसून श्रद्धा, नम्रता आणि पर्यावरणाशी सुसंवादाची एक अविरत यात्रा आहे. वारकऱ्यांचे साधेपणाचे जीवन, निसर्गावरील अपार प्रेम आणि समर्पणाची भावना हरित व जागरूक जग घडवण्याच्या ध्येयाशी पूर्णपणे सुसंगत आहे. परस्परांचा सन्मान करून एकत्रितपणे चालत राहणे आणि निसर्गाशी स्नेहभाव जपण्याची शिकवण वारी देते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *