ग्लोबल गणेश फेस्टिवलअंतर्गत  ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी ‘गणेश दर्शन’ पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा ज्येष्ठ, दिव्यांगांशी संवाद

ग्लोबल गणेश फेस्टिवलअंतर्गत  ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी ‘गणेश दर्शन’ पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा ज्येष्ठ, दिव्यांगांशी संवाद

 
 
पुणे, दि. ५-  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित ग्लोबल गणेश फेस्टिवलअंतर्गत ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी ‘गणेश दर्शन’ सहलीचे आयोजन (  ‘Ganesh Darshan’ trip organized for senior citizens and disabled as part of Global Ganesh Festival) केले होते. राष्ट्रप्रथम ट्रस्ट, सदैव फाऊंडेशन आणि अमित फाटक फाऊंडेशन यांचे यामध्ये सहकार्य लाभले. सोमवारी व बुधवारी या दोन दिवशी ही गणेश दर्शन सहल निघाली. दोन्ही दिवस मिळून सुमारे ३०० ते ३५० ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
 
शनिवारवाड्यात एकत्रित येऊन या गणेश दर्शन सहलीची सुरवात झाली. कसबा गणपाती, भाऊसाहेब रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई आणि अखिल मंडई गणपती असा या सहलीचा मार्ग होता. राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई  (State Tourism, Mining and Ex-Servicemen Welfare Minister Shambhuraj Desai )   यांनी बुधवारी या गणेश दर्शन सहलीला भेट देऊन ज्येष्ठ व दिव्यांग भक्तांशी संवाद साधला. 
 
या सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात पुणे पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार(shama pawar), अनंत जोगदंड, उपलेखापाल मयूर नांद्रे, विभागीय प्रकल्पाधिकारी स्नेहल हरपाळे, कनिष्ठ लिपिक आकर्षण मस्के, कर्मचारी निलेश तुंगतकर, ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे कार्यकारी अधिकारी ऋषिकेश कायत, आंतरराष्ट्रीय समन्वयक अथर्व वाघ, अमन अलकुंटे, ऋतुजा नराल, गणेश बेंद्रे यांनी पुढाकार घेतला. 
 
बाप्पाचा आशीर्वाद घेण्याची संधी या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग गणेशभक्तांना दिली जातेय, हे स्तुत्य आहे. ग्लोबल गणेश फेस्टिव्हलअंतर्गत पर्यटन विभागाने घेतलेला हा पुढाकार निश्चित आनंददायी आहे, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *