पिंपरी, दि. २७ – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘तुम आ गये हो.. नूर आ गया हैं…’ या सुमधुर हिंदी – मराठी गीतांच्या ऑडिओ – व्हिज्युअल नि:शुल्क सांगीतिक मैफलीत श्रोत्यांना चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अन् दिग्गज गायकांनी अजरामर केलेल्या गीतांची मेजवानी मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने रफी, किशोर, मुकेश, हेमंतकुमार, कुमार शानु या ख्यातनाम गायकांसह लता आणि आशा भोसले या विख्यात गायिकांनी अजरामर केलेल्या गीतांचा समावेश असल्याने श्रोत्यांना चित्रपटसंगीतातील सुवर्णकाळाची सुरेल अनुभूती मिळाली.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक २५ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, सतीश कापडी, सुभाष चव्हाण, विजय संबारे, विलास खरे, डॉ. किशोर वराडे, रवींद्र ओव्हाळ, सतीश गायकवाड, नीलेश मोरे, निराली मांकड, विजय सहारे, सुभाष बोरोले, नरेंद्र जोशी, सुवर्णा जोशी, मनीषा जगताप, वैशाली जगताप, कुमार भालेराव, सुनंदा भालेराव, कनिष्क भालेराव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना आणि शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे, डॉ. सायली बांबुरडे, शुभांगी पवार, स्वाती पाटील; तसेच अतिथीगायक विजय वाघमारे (रफी भक्त) आणि तुषार पिंगळे (किशोर भक्त) यांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून चित्रपटसंगीतातील काही लोकप्रिय आणि काही विस्मरणात गेलेल्या सुमधुर गीतांचा नजराणा पेश करीत रसिकांची मने जिंकून (By presenting a gift of melodious songs, winning the hearts of the audience) घेतली. त्यामध्ये मैफलीत ‘ए दिल – नादान…’ , ‘दिल में हो तुम…’ , ‘ना तुम हमे जानो…’ , ‘क्या से क्या हो गया…’ , ‘खिलते हैं गुल यहाँ…’ , ‘कोई लौटा दे मेरे…’ , ‘ये हवा मेरे संग संग चल…’ , ‘मेरा नाम चिन चिन चूं…’ , ‘अगर तुम ना होते…’ , ‘बिजली गिराने मैं हूं आयी…’ , ‘ना ये चाँद होगा…’ या एकल स्वरातील गीतांनी श्रोत्यांना मोहित केले असतानाच ‘ले चल मेरे जीवनसाथी…’ , ‘गाता रहे मेरा दिल…’ , ‘जे हम तुम चोरीसे…’ , ‘याद किया दिलने…’ , ‘ या युगुलस्वरातील गीतांनी श्रोत्यांची मनावर गारुड केले. ‘तुम आ गये हो.. नूर आ गया हैं…’ या मैफलीच्या शीर्षकगीताच्या युगुलस्वरातील अप्रतिम सादरीकरणाने मैफलीचा कळसाध्याय गाठला गेला.
त्यानंतर ‘तेरे हाथों में पहना के चुडियाँ…’ , ‘आँखों से दिल में उतर के…’ , ‘तुम्हे याद होगा…’ , ‘बेखुदी में सनम…’ , ‘जिना क्या अजी प्यार बिना…’ , ‘नाम गुम जायेगा…’ , ‘चल मेरे भाय…’ , ‘ओ मेरे राजा…’ , ‘तेरी बिंदीया रे…’ , ‘दिल की नजर से…’ या एकाहून एक सरस गीतांचा कारवाँ ‘हमको तुमसे हो गया हैं प्यार…’ या अतिशय दमदार गीताच्या सादरीकरणातून रसिकांच्या अंत:करणात जाऊन पोहोचला. अतिथीगायक विजय वाघमारे आणि तुषार पिंगळे यांनी अनुक्रमे महंमद रफी अन् किशोरकुमार यांच्या आवाजातील चपखल सादरीकरणातून या दोन्ही महान गायकांच्या आवाजाचा पुन:प्रत्यय रसिकांना दिल्याने त्यांच्या गीतांना भरभरून दाद मिळाली.
विनायक कदम यांनी संयोजन केले; कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती.
सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. सुहास चांगण यांनी छायाचित्रण केले. दृश्यनिर्मिती विक्रम क्रिएशनच्या साहाय्याने करण्यात आली. घनश्याम आगरवाल यांनी अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत शैलीतून निवेदन केले.