पुणे: कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश सोमनाथ भोकरे यांच्या प्रचाराची सांगता बाईक रॅली व ग्रामदैवत कसबा गणपतीच्या दर्शनाने झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भोकरे यांनी ओंकारेश्वर ते कसबा गणपती मंदिर अशी बाईक रॅली काढली. ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन सुरु झालेली बाईक रॅली शनिवार पेठ, कसबा पेठ, प्रभाग १६, प्रभाग १७, घोरपडी, मोमीनपुरा, लोहियानगर, शुक्रवार पेठ, खडकमाळ, गंजपेठ, कशेडी पूल, फुलवाला चौक, भोरी आळी, पवळे चौक, कसबा गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन समाप्त झाली.
या बाईक रॅलीला सर्वच भागात नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत झाले. गणेश भोकरे यांचे औक्षण झाले. रॅलीमध्ये मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे, आशिष देवधर, विनायक खोतकर, शहर संघटक निलेश हांडे, सचिव रवी सहाणे, आशुतोष माने धनंजय दळवी, वसंत खुटवड, संग्राम मळेकर, सारंग सराफ, अमृता भोकरे, नीता पालवे यांच्यासह मनसेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रेल्वे इंजिनासमोरील बटन दाबून गणेश भोकरे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना रॅलीतून करण्यात आले.
गणेश भोकरे म्हणाले, “प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्या उमेदवारीचे सर्व स्तरांतून स्वागत होत होते. आज अखेरच्या दिवशी बाईक रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून माझा विजय निश्चित होणार, हा विश्वास आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा लक्षणीय टक्का माझ्या पाठीशी उभा आहे. मनसेच्या इमानदार कार्यकर्त्याला यंदा निवडून देण्याचा निश्चय मतदारांनी केल्याचे मला या वीस दिवसात दिसले आहे. आमदार म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. कसब्यातील माताभगिनी, युवक आणि नागरिक माझ्या पाठीवर मतदानाची थाप टाकतील, याची खात्री आहे.”