‘कस्तुरी स्कुल ऑफ लॉ’तर्फे १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence), वैवाहिक मतभेद, घटस्फोटित महिलांच्या समस्या (Problems of Divorcee), महिलांचे हक्क व अधिकार, लहान मुलांच्या समस्या, लहान मुलांचे हक्क व अधिकार, (Women and Child rights) एकेरी पालकत्व, वारसा हक्क विषयी वाद, मृत्युपत्र, पॉवर ऑफ अटर्नी, (Power of atorny) कामगार व मालकांचे हक्क आणि कायदे, बौद्धिक संपदा हक्क व कायदा अशा विविध विषयांवर या सप्ताहात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा व प्राचार्य डॉ. जयश्री पलांडे (Jayashri Palande) यांनी सांगितले.
कायद्यासंदर्भात नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्र (Free Legal advice and aid center) सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विविध प्रकारचे वाद मिटविण्यासाठी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रतीक पलांडे (Pratik Palande) यांनी नमूद केले. मोफत नावनोंदणीसाठी https://docs.google.com/forms/ d/1A4N5yuc4tX5q0k- 2iD2eLlPCXShRFXFOhpfj9wjxoE8/ prefill यावर भेट द्यावी.
एनजीओ, पोलीस, महिलांचे अधिकार, विद्यार्थ्यांच्या समस्या, ग्राहक कायदा, कंपन्यांमधील कामगार, शेतीविषयक कायदे, मालमत्ता व जमीनविषयीचे वाद, भाडेकरूंच्या समस्या आदी विषयांवर मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे नागरिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९०२२०३४३८० या क्रमांकावर किंवा कस्तुरी शिक्षण संस्थेचे स्कुल ऑफ लॉ, शिक्रापूर, ता. शिरूर (Shirur) येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपप्राचार्य डॉ. सपना देव (Sapana Deo) यांनी केले आहे.