‘सूर्यदत्ता’तर्फे ७५ नोकरदारांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सूर्यदत्ता ग्रुपतर्फे राष्ट्राला आगळीवेगळी मानवंदना
पुणे : “भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असल्याबद्दल सूर्यदत्ता एज्युके शन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात नोकरी करणाऱ्या ७५ तरुणांना उच्च शिक्षणासाठी सूर्यदत्ता इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरफेस (सीएसआर) इनिशिएटिव्ह’ अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्राला अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा मानस आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अर्धवेळ अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे,” अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आणि मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांनी दिली आहे.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या पुढाकारातून दरवर्षी नोकरदारांना अर्धवेळ शिक्षण घेण्यासाठी ही प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती योजनेचे यंदा बारावे वर्ष आहे. गेल्या ११ वर्षात १३०० पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी अडीच ते तीन कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. २०० पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शिफारशीची विनंती केली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उमेदवार कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर, तसेच २२ ते ५५ या वयोगटातील असावा. सर्वच क्षेत्रातील नोकरदारांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी याचा लाभ घेता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक फटका बसलेल्याना प्राधान्य दिले जाणार आहे.”
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांशी संलग्नित पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (पीजीडीएमएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इम्पोर्ट-एक्स्पोर्ट मॅनेजमेंट (पीजीआयईएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शिअल सर्व्हिसेस (पीजीडीएफएस), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल अँड लॉजिटिक्स मॅनेजमेंट (पीजीडीएमएलएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड (पीजीडीएफटी) या एक वर्षाच्या पाच अभ्यासक्रमांना ही शिष्यवृत्ती लागू आहे. प्रोडक्शन मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, लाईन लीडर, सिनिअर इंजिनिअर, हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंजिनिअर, टीम मेम्बर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, डायरेक्टर, पर्चेस ऑफिसर, स्टोअर असिस्टंट, सुपरिंटेंडेंट्स आदी पदांवर काम करणारे यासाठी पात्र असतील. कर्मचाऱ्यांना वर्गांना उपस्थित राहता यावे, यासाठी सर्व लेक्चर्स विकेंडला कार्यालयीन वेळेनंतर होणार आहेत. सूर्यदत्ता संस्थेत ज्युनिअर क्लार्क, समन्वयक, लायब्ररीयन, रिसेप्शनिस्ट व अन्य कनिष्ठ पदांवर काम करणाऱ्या ७० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आज अनेक कर्मचारी पीएचडी करत आहेत. अनेकांना बढती मिळाली असून, काहीजण वरिष्ठ, तसेच संचालक पदापर्यंत पोहोचले आहेत. तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, हे या योजनेचे मोठे यश आहे,” असेही सुषमा चोरडिया यांनी नमूद केले.
सिद्धांत चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात. विविध कंपन्यांकडून इच्छूक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यातून योग्य उमेदरवारांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे पदवीचे शिक्षण झाले की अनेक तरुण नोकरी करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा तरुणांना पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची संधी सूर्यदत्ततर्फे दिली जात आहे. केवळ आर्थिक अडचण असल्याने शिक्षण थांबू नये, हा यामागील उद्देश आहे. कंपन्या पदवीधरांना बढती देत नाहीत. त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन मधील स्पेशालिटी हवी असते. शिवाय, स्वयंरोजगार करत असलेल्या तरुणांनाही आपल्या ज्ञानात भर घालण्याची संधी यामुळे मिळणार आहे. नोकरदार, छोटे व्यावसायिक यांना शिष्यवृत्ती देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. जेणेकरून त्यांना करिअरमध्ये प्रगती करता येईल.”
टाटा याझकी, नोव्हार्टीस, आयडीबीआय बँक, झेडएफ स्टिअरिंग, हिंदुस्थान कोकाकोला, सँडविक, भारत फोर्ज, मर्सिडीज बेन्ज, सिप्ला, किर्लोस्कर, चौघुले इंडस्ट्रीज, सहज इन्फोटेक आदी कंपन्यांतून कर्मचारी या योजनेचे भाग झालेले आहेत. आपले शिक्षण आणि कौशल्ये त्यांनी विकसित केले आहेत. या शिष्यवृत्ती योजनेला कर्मचारी व व्यवस्थापनाकडून उत्तम प्रतिसाद लाभला असून, संस्थेच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२१ अशी आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी ०२०-२४३२५८३० किंवा ८९५६९३२४१५ यावर प्रा. नूतन जाधव यांचेशी संपर्क साधावा किंवा www.simir.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे चोरडिया यांनी नमूद केले.