पुणे, ता. १५: न्यू इरा पब्लिकेशन प्रकाशित प्रसिद्ध लेखक, कवी फ. मु. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन येत्या शुक्रवारी (दि. १७) सकाळी १०.३० वाजता डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी येथे होणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे असणार आहेत.
विडंबनकार, निर्माते, लेखक व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांची विशेष उपस्थिती, तर लेखक-समीक्षक रमेश वरखेडे, स्त्रीरोगतज्ज्ञ व कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर व लेखक-समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
