पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजकांसाठी ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण’ एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी वंचित विकास केंद्र कार्यालय, नारायण पेठ, पुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेत शासकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्योग करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय, आपण करत असलेला व्यवसाय व प्रत्यक्ष व्यवसाय निर्मितीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये दिले जाणार आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता, प्रपोजल बनविणे, सरकारी योजना व संधी, कर्ज मिळवून देणे, प्रोडक्शन फायनान्स, मार्केटिंग, सोशल मिडीया मार्केटिंग, व्यावसायिकाची मानसिकता आदी विषय कार्यशाळेमध्ये चर्चिले जाणार आहेत.