आजकाल तंत्रज्ञान आधारित जगात सायबर फ्रॉड हे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि अनेकजण या सायबर फ्रॉडला बळीदेखील पडत आहेत. इंटरनेटवरील गुन्हे रोखण्यासाठी भारतातील अग्रगण्य बी 2 बी पेमेंट सोल्यूशन कंपनी इझीबझ तर्फे सातार्यातील वाई येथे सायबर फ्रॉड मोहिम राबविण्यात आली . ह्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत सायबर सुरक्षा वर्तन बदलण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. इझीबझ हे ऑनलाइन सेवांवर विश्वास निर्माण करण्यासाठी अद्ययावत सायबरसुरक्षा शिफारशींना प्रोत्साहन देते आणि नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक डेटा ऑनलाइन संरक्षित करण्यात मदत करते.
या मोहिमेची थीम हॅशटॅग से नाह आहे. ही थीम व्यक्तींना त्यांचे ओटीपी, पासवर्ड, सिव्हिवी इत्यादी शेअर न करण्यास प्रोत्साहित करते. या कार्यक्रमास वाईतील सरपंच उदयसिंग ठाकूर आणि इझीबझचे रिस्क अँड कमपायलन्सचे संचालक अजय कुमार उपस्थित होते.पुण्यात मुख्यालय असलेल्या, इझीबझ ने अज्ञात सायबर धोक्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला असून सायबर हल्ल्यांना प्रतिबंध करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे .ऑनलाइन फसवणूक ओळखणे आणि चांगल्या सायबरसुरक्षा सवयी अंगीकारणे यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी इझीबझ प्रयन्त्नशील आहे.
या मोहिमेच्या आधारे, इझीबझ ने उपस्थितांना योग्य माहिती दिली, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांची फसवणूक करू शकणार्या विविध पद्धतींबद्दल त्यांना शिक्षित केले. त्याचप्रमाणे सायबर फ्रॉडच्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि ते सायबर सुरक्षित असल्याची खात्री कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. चर्चासत्र अधिक संवादात्मक आणि अधिक माहिती समजण्याकरिता सायबर सुरक्षा जागरूकता संबंधित व्हिडिओ प्ले करण्यात आले. ईमेल स्कॅम, फोन स्कॅम, एसएमएस स्कॅम, मार्केटप्लेस स्कॅम या विषयांवर चर्चा झाली. एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती काढून घेण्यासाठी कशाप्रकारे आकर्षक मजकूर संदेश वापरले जातात याचेही मार्गदर्शन यावेळीस देण्यात आले.
सायबर घोटाळ्यांबद्दल बोलताना, इझीबझचे रिस्क अँड कमपायलन्सचे संचालक अजय कुमार म्हणाले की नागरिकांना जेव्हा संशयास्पद किंवा फसवे मेल किंवा एसएमएस येतात तेव्हा त्यांनी सावध झाले पाहिजे. लिंकवर क्लिक करताना सावधगिरी बाळगून वापर केला पाहिजे कारण फसवणूक करणारे वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती जसे की बँक खात्यांचे तपशील, ओटीपी, कार्ड तपशील इत्यादी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू शकतात. अनेक वेळा अपुर्या ज्ञानामुळे सायबर गुन्हे घडत आहेत. इझीबझचे व्यवस्थापकीय संचालक रोहित प्रसाद म्हणाले की लोकांना सायबरसुरक्षेमधील योग्यरित्या मार्गदर्शनामुळे नक्कीच फायदा होईन तसेच या माध्यमातून आम्ही सायबर सुरक्षितता वाढवण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहोत या दृष्टीकोनातून, आम्ही वाईमधील लोकांशी संवाद साधण्यात सक्षम झालो आणि त्यांना सायबर धोक्यांविषयी माहिती देऊन ग्रामीण भागातील लोकांमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जागरूकता निर्मांण केली.