प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मार्गदर्शन; ‘सूर्यदत्त’ व ‘जोबीझा’ यांच्यातर्फे ग्लोबल एचआर समिट

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मार्गदर्शन; ‘सूर्यदत्त’ व ‘जोबीझा’ यांच्यातर्फे ग्लोबल एचआर समिट

 
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मार्गदर्शन;’सूर्यदत्त’ व ‘जोबीझा’ यांच्यातर्फे ग्लोबल एचआर समिट
सूर्यदत्त ग्रुप इन्स्टिट्यूट्स व जोबीझा तर्फे आयोजित ग्लोबल एचआर समिटमध्ये २०० जणांचा सहभाग
अचूक व योग्य व्यक्तीची पारख करण्याची ‘एचआर’वर जबाबदारी
बदलत्या काळात योग्य व्यक्तीची निवड करण्याचे ‘एचआर’समोर आव्हान
ज्येष्ठ एचआर तज्ज्ञ गजानन मोरे यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’ व ‘जोबीझा’ यांच्यातर्फे ग्लोबल एचआर समिट
 
पुणे : “आपल्या कंपनी व संस्थेसाठी चांगले मनुष्यबळ देत एकप्रकारे तुम्ही (मनुष्यबळ विभाग-एचआर) राष्ट्राच्या उभारणीत योगदान देता आहात. आजीवन शिक्षण, ज्ञानाची आस असलेल्या युवापिढीला घडविण्याचे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देण्याचे दायित्व तुमच्यावर आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी खारीचा वाटा उचलावा,” असे मत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले. बदलत्या काळात अचूक व योग्य व्यक्तीची पारख करण्याची जबाबदारी ‘एचआर’वर असून, कंपनीच्या, संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देऊन शकणाऱ्या चांगल्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याचे आव्हान ‘एचआर’समोर असते, असे ज्येष्ठ एचआर तज्ज्ञ गजानन मोरे यांनी नमूद केले.
 
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व जोबिझा आयोजित ‘ग्लोबल एचआर लिडर्स समिट अँड एक्सलंन्स अवॉर्ड्स’ कार्यक्रमात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. या समिटमध्ये विविध संस्था व कंपन्यांचे सीईओ, मॅनेजर, एचआर हेड अशा २०० जणांनी सहभाग घेतला. प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, कार्यकारी संचालक अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, अतुल देशपांडे, रंजना मोहिते, जोबिझा मल्टिपल सर्व्हिसचे एमडी गौरव शर्मा आदी उपस्थित होते. ‘सूर्यदत्त’मधील एमबीए व हॉटेल मॅनेजमेंटच्या स्वयंसेवकांनी एचआर समिट यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
 
अजय मुदलियार (टेक महिंद्रा), संगीता सिंग (सिम्प्लिफाय हेल्थकेअर), स्वप्ना संगारी (क्विक हिल टेक्नॉलॉजी), अँड्र्यू सायमन (ईक्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड), निलोय बक्षी (व्होडाफोन), झरना त्रिवेदी (वर्सा नेटवर्क्स), शंकर साळुंखे (टीएम ऑटोमोटिव्ह सीटिंग सिस्टिम्स), राजू पी. एस. (लुमॅक्स इंडस्ट्रीज) यांना ”ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड-एचआर लीडर’, राहुल बगळे (फोर्स मोटर्स), रमण रैना (हनीवेल ऑटोमेशन), सुधांशु पंडित (परफोर्स सॉफ्टवेअर), डॉ. ब्रिलियन एस. के. (टाइम्स प्रो), अभिनव गेरा (लुमॅक्स इंडस्ट्रीज) यांना ”ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड-सीएचआरओ’, तर गजानन मोरे (एचआर सिस्टीम लिमिटेड) यांना ‘ग्लोबल एचआर एक्सलन्स लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२३’ने सन्मानित करण्यात आले.
 
समिटमध्ये ‘इम्पॅक्ट अँड रिफॉर्म्स इन एचआर’ व ‘इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशिएल इंटेलिजन्स इन एचआर’ या दोन विषयावर चर्चासत्रे झाले. ग्लोबल चेंबर यूएसएचे संस्थापक डौग ब्रुहँके (ऑनलाईन), सिंगापूर येथील मायफिनबी सेंटर ऑफ एआय इनोव्हेशनचे संस्थापक नाझरी मुहद, हेड पार्टनरशिप ऍडिइन्नूर हमीझाह, मलेशियातील अमीरूल असरफ, स्कॅफ्लरचे सीएचआरओ शंतनू घोषाल, अकोलाईटचे मिलिंद मुतालिक, कमिन्सचे एचआर संचालक रितेश जोशी, टाटा ग्रीन बॅटरीचे सीईओ रामा शंकर पांडे आदी सहभागी झाले होते.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना सर्वांगीण, रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षण देण्यावर ‘सूर्यदत्त’ने नेहमी भर दिला आहे. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला जोडणारा ‘एचआर समिट’चा हा कार्यक्रम आहे. ‘सूर्यदत्त’ विविध पातळ्यांवर काम करत असून, यंदा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवत आहोत. शैक्षणिक कार्याबरोबर समाज घडण्यासाठी आवश्यक गोष्टी सातत्याने आम्ही करतो. कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट) हे कौशल्याचे काम आहे. त्यामुळे एचआर म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांनी यासाठी लागणारी कौशल्ये विकसित करावीत.”
 

ज्युरी म्हणून प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्यासह सौरभ शहा, संग्रामसिंह पवार, नीरज कुमार गुप्ता, अवंतिका भारद्वाज, राजेंद्र राऊत, अरुणा हुरकडली, शिल्पा आगरकर, अभिजित पुरी, सुधीर मतेती आदी उपस्थित होते. सिद्धांत चोरडिया यांनी समिटच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. गौरव शर्मा यांनी आभार मानले.

 
फोटो ओळ :
बावधन : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व जोबिझा मल्टिपल सर्व्हिस आयोजित ‘ग्लोबल एचआर लिडर्स समिट अँड एक्सलंन्स अवॉर्ड्स’ कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त मान्यवर व चर्चासत्रात सहभागी झालेले वक्ते यांसमवेत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया, स्नेहल नवलखा, सिद्धांत चोरडिया आदी.
 
 
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *