Post Views: 18
ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते बुधवारी (ता. १८) वितरण
पुणे, दि. १४- ज्येष्ठ इतिहास संशोधक व विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. आ. ह. साळुंखे यांना यंदाचा शिवस्वराज्यभूषण पुरस्कार जाहीर ( Senior historical researcher and thinker Dr. Jayasingrao Pawar and Dr. A. H. Salunkhe have been awarded this year’s Shivswarajya Bhushan Award. ) करण्यात आला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार व कोल्हापूरचे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे. येत्या बुधवारी (ता. १८) दुपारी ४ वाजता समारा बँक्वेट हॉल, भूगाव, पौड रोड पुणे येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम इंगवले आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यांनी दिली.(Anil Pawar, President of Sahyadri Pratishthan, gave)
अनिल पवार म्हणाले, “अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत युगपुरुष, राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे; तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान आहेत. नुकताच महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर झाला आहे. शिवराज्याभिषेकदिन अर्थात शिवस्वराज्यदिनाचे औचित्य साधत दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. डॉ. जयसिंगराव पवार यांना २०२४ साठी, तर डॉ. आ. ह. साळुंखे यांना २०२५ या वर्षासाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिन राज्यातील प्रत्येक गावात साजरा व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावाने यंदा हा शिवराज्याभिषेक दिन साजरा केल्याचे समाधान आहे. महाराष्ट्रातील २८ हजार ग्रामपंचायती आणि ४३ हजार गावांमध्ये हा सोहळा साजरा व्हावा, त्यातून शिवविचारांचा जागर व्हायला हवा.”