जागतिक नारळ दिनानिमित्त सेवाभावी संस्थांना सूर्यदत्ता फूड बँकेकडून नारळांचे दान

जागतिक नारळ दिनानिमित्त सेवाभावी संस्थांना सूर्यदत्ता फूड बँकेकडून नारळांचे दान

भारतीय संस्कृतीत आरोग्यदायी नारळाला विशेष महत्व
सुषमा चोरडिया यांचे मत; ‘सूर्यदत्ता’तर्फे जागतिक नारळ दिनानिमित्त सेवाभावी संस्थांना नारळाचे दान
————————————————————————————————————–
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती रुजविण्यासाठी ‘सूर्यदत्ता’चा पुढाकार
सुषमा चोरडिया यांचे मत; ‘सूर्यदत्ता’तर्फे जागतिक नारळ दिनानिमित्त सेवाभावी संस्थांना नारळाचे दान
 
पुणे : जागतिक नारळ दिनानिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत शहरातील विविध सेवाभावी संस्थांना नारळाचे दान करण्यात आले. सावली प्रतिष्ठान, उमेद फाउंडेशन, अनिकेत सेवाभावी संस्था यांच्यासह एकूण ११ संस्थांना प्रत्येकी १०० याप्रमाणे ११०० नारळांचे वाटप करण्यात आले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. ‘सूर्यदत्ता’च्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला, हस्तकला यातून नारळाचे महत्व आणि त्याच्या प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती रुजावी यासाठी सूर्यदत्ता संस्थेच्या वतीने नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले जाते. भारतीय संस्कृतीला केंद्रित करून विद्यार्थ्यांनी नारळाच्या विविध चित्रकृती रेखाटल्या आहेत.
 
संस्थेच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या हस्ते या संस्थांना नारळ वाटप झाले. सावली प्रतिष्ठानचे किसन शिंदे, उमेद फाउंडेशनचे राकेश सणस, अनिकेत सेवाभावी संस्थेचे गणेश तनपुरे यांनी हे नारळ स्वीकारले. प्रसंगी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे समूह संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, संचालक प्रशांत पितालिया, प्रा. रोहित संचेती यांच्यासह संस्थेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके यांनी या उपक्रमाचे समन्वयन केले. 
 
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “भारतामध्ये विशेषता संपूर्ण आशिया आणि पॅसिफिक खंडामध्ये २ सप्टेंबर हा जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा होतो. नारळामध्ये मॅगनीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ते उपयोगी पडते. तसेच नारळामुळे प्रतिकारशक्ती वाढते. मधुमेह, त्वचा, केस याकरिताही नारळ महत्त्वाचा ठरतो. भारतीय संस्कृतीत नारळाला विशेष महत्त्व असून, कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना किंवा पूजेसाठी नारळाला विशेष महत्व आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रा. डॉ. चोरडिया यांनी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरे करायचे ठरवले आणि त्यातून सेवाभावी संस्थांना नारळाचे दान करण्याचा उपक्रम झाला.”
 
“संस्थेच्या फूड बँक व एज्यु-सोशिओ कनेक्ट उपक्रमांतर्गत गरजू सेवाभावी संस्थांना नारळ दान करण्यात आले. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बावधन येथे हा कार्यक्रम झाला. दर्जेदार शिक्षण देण्यासह सूर्यदत्ता शिक्षण संस्था सामाजिक जाणिवेतून काम करत असून, या सेवाभावी संस्थांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असेही सुषमा चोरडिया यांनी नमूद केले. मुलांना पौष्टिक आहार उपलब्ध करून दिल्याबद्दल अनिकेत सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी गणेश तनपुरे यांनी आभार मानले. उमेद फाऊंडेशनचे राकेश सणस म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मदत झाल्याने मुलांना विशेष आनंद वाटेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *