‘दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ दीपक हिरवे, मनीषा गाडे यांना जाहीर

‘दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ दीपक हिरवे, मनीषा गाडे यांना जाहीर

‘दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’
दीपक हिरवे, मनीषा गाडे यांना जाहीर
२५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देणार; रविवारी (दि. २२) वितरण सोहळा

पुणे: ‘दिशा परिवार चारिटेबल ट्रस्ट संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ विनामूल्य योग प्रशिक्षण दीपक हिरवे व झोपडपट्टीतील महिलांना आरोग्यविषयक सल्ला, वैद्यकीय मदत मिळवून देणाऱ्या मनीषा गाडे यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यामध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील २५० गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर दात्यांच्या माध्यमातून शैक्षणिक अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख राजाभाऊ चव्हाण यांनी दिली.

राजाभाऊ चव्हाण म्हणाले, “येत्या रविवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड पुणे येथे होणाऱ्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गणितज्ज्ञ प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव असतील. सामाजिक कार्यकर्त्या ऍड. मिताली सावळेकर व दिशा परिवारचे सल्लागार बी. एल. स्वामी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व २५०००/- रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.”

“दिशा परिवार चारिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत असून, आतापर्यंत सहा हजारहून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यामध्ये संस्थेचा मोलाचा वाटा आहे. ‘आम्ही फक्त दोन हातांतील अंतर कमी करतो’ या ब्रीदवाक्यावर संस्थेचे काम सुरु आहे. यंदा सामाजिक दात्यांच्या हस्ते २५० गरजू व हुशार विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात येणार आहेत,” असे चव्हाण यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *