पुणे, दि. ८ – देवांश (devansh )या केवळ दीड वर्षाच्या चिमुरड्याला स्पाइनल मस्क्युलर अट्रॉफी (SMA) टाइप 2 नावाचा एक दुर्मिळ, प्रगतिशील आनुवंशिक आजार झाला आहे. या आजारामुळे देवांशचे स्नायू कमजोर होऊ शकतात आणि हळूहळू त्याची चालणे, खाणे आणि अगदी श्वास घेण्याची क्षमताही कमी करू शकतो. या भयंकर आजाराची प्रगती थांबवण्यासाठी एकमेव आशा आहे, ती म्हणजे ‘झोल्गेन्समा’ ही थेरपी, जी एकदाच देण्यात येणारी जीन थेरपी आहे. या उपचाराचा खर्च १६ कोटी रुपये इतका आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबाला हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे देवांशच्या हतबल पालकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. तुमचे योगदान मोठे असो की छोटे किंवा फक्त या मोहिमेला शेअर करणे देखील देवांशच्या आयुष्यात मोठा फरक करू शकते. कृपया या मोहिमेला पाठिंबा द्या किंवा तुमच्या नेटवर्कमध्ये याचा प्रचार करा. एकत्र येऊन, आपण देवांशला आरोग्यदायी आणि वेदनारहित आयुष्य देऊ शकतो, असे आवाहन देवांशचे पालक लवीना व हर्षल भावसार यांनी केले आहे. आपली मदत supportdevansh97@yesbankltd या upi id वर पाठवावी.
अधिक माहितीसाठी: धनश्री भावसार (98508 90600)