दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल पुणे परिवारातील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धा परीक्षा व राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांत मिळवलेल्या यशाबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात पाटील बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून केंद्रीय अपंग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पंजाब येथील अंधत्वावर मात करून आयएएस झालेले अजय अरोरा, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, बजाज फिनसर्व्हच्या सीएसआर समितीच्या प्रमुख शेफाली बजाज, दीपस्तंभ फाऊंडेशनचे मुख्य सल्लागार मधुकर कोतवाल, संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, ग्लोबल सदस्य अमित वाईकर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजचा हा कार्यक्रम इतका भावस्पर्शी झाला आहे, की मी भारावून गेलो आहे.. एखादा अवयव नसल्याने काहीच बिघडत नाही, जे आपल्या कडे आहे त्या द्वारे काय कर्तुत्व गाजवता येत हे दाखवणारा हा सोहळा आहे. सरकारी कामात प्रेरणा जागृत करण्याची, संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज आहे. लोकांचे सहकार्य व सहभाग महत्वाचा आहे. समाजामध्ये देण्याची मोठी ताकद आहे. आपल्याला केवळ देण्याची इच्छा निर्माण करायला हवी.
राजेश अग्रवाल म्हणाले, “दिव्यांगाच्या करिअर व शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी देशात दीपस्तंभ मनोबलसारख्या संस्थाची आवश्यकता आहे. मनातील उमेद, जिद्द कधीच हरू नका. आपल्यातील इच्छाशक्ती, करुणाभाव आणि व्यावसायिकता आपल्याला यशाकडे घेऊन जाते.”
अजय अरोरा म्हणाले, “दीपस्तंभमधील या मुलांचे यश संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. सातत्याने शिकण्याची भूक, अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वृत्ती आणि बदलांचा दुवा बनण्याची मानसिकता जोपासत रहा. येणारा काळ नव्या अडचणी घेऊन येईल. त्यामुळे आत्मविश्वासाने काम करा.”
प्रास्ताविकात यजुर्वेंद्र महाजन म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना समाजात सर्वात जास्त गरज आहे, अश्या दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडावीत या उद्देशाने दीपस्तंभची स्थापना झाली. लोकसभागातून जळगाव व पुणे येथे देशभरातल्या ४०० विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. त्यांना प्रेम, आनंद, आत्मसन्मान मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढून ते आत्मनिर्भर व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या गुणवंतांचा झाला सत्कार
यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेले फरहान जमादार (UPSC Air 191), आयुष अग्रवाल (UPSC Air 341), श्रवण देशमुख (UPSC Air 976), प्रितेश बाविस्कर (UPSC Air 767), सुरेश बोरकर (UPSC Air 658), प्रियांका मोहिते (UPSC Air 595), विजय साळवी (आरबीआय), सुजित शिंदे (शिक्षणाधिकारी), नारायण इंगळे (आरएफओ), दीक्षा दिंडे (युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स, लंडन), रवीना इंगोले (आयआयटी मुंबई), पंकज गिरासे (TISS), राज महाजन (जेजे स्कुल ऑफ आर्ट), प्रणित गुप्ता (आयआयएम), सुरज तिवारी (आयआयएस), अनुराधा सोळुंके (व्हीलचेअर फेन्सिंग वर्ल्डकप), राजेश पिल्ले (टीसीएस), अजय पठाळे (बँक अधिकारी), मोहिनी शर्मा (बँक अधिकारी), वामीका शर्मा (बँक अधिकारी), वैष्णवी गोळे (प्रशासकीय अधिकारी, युनाइटेड इन्शुरन्स कंपनी), प्रियांका गायकवाड (बँक अधिकारी), दीपक गजरे (बँक अधिकारी), प्रशांत केदारे (बँक अधिकारी), शुभम गुप्ता (एसएससी), श्रीहरी हगारे (बँक अधिकारी), ऋषिकेश आढाव (आरबीआय अधिकारी), मेहबूब पिंजारी (एसएससी), गजाजन औटकर (एसएससी), शशिकांत कुलट (EPFO), संतोष भोसले (STI), प्रतीक शिंदे (एसएससी), विशाल जगताप (STI), विकास राठोड (ASO), ऋषिकेश पवार (कर सहाय्यक), अमोल शिंदे (PSI), सतीश बऱ्हाटे (STI), ज्ञानेश्वर चांगण (ITI प्रशिक्षक), सूर्यकांत पाटील (अधीक्षक, वैद्यकीय विभाग), सतीश कल्याणी (पीएसआय), पूजा शर्मा (नर्सिंग), सिद्धी दळवी (दहावी ९४%), सुमन सरदार (महानगरपालिका पुणे), सुनील खेडकर (सहकार अधिकारी), चैताली पातावार (सेट) यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. सोबतच दीपस्तंभ मनोबल परिवाराचे हितचिंतक लुंकड कंस्ट्रक्शनचे रवींद्र लुंकड, अनिल कुलकर्णी, बॉशचे आदित्य आढवी, मॅग्नाचे बेल्लेकर, गंगाधर पाटील यांचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आला.