नवनीत शर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ‘आत्मनिर्भर भारत’वर भर
पुणे : जगातील अग्रणी वातानुकूलक (एसी) कंपनी डायकिन इंडस्ट्रीज (Daikin Industries) लि. जपान (Japan) यांची उपकंपनी डायकिन एअर-कंडिशनिंग (Air Conditioning) इंडिया प्रा. लिमिटेड यांच्याकडून स्प्लिट रूम वातानुकूलकांची (एसी – AC) एक नवीन श्रेणी सादर करण्यात आली आहे. चोखंदळ भारतीय ग्राहकांसाठी असलेल्या या श्रेणीची संकल्पना आणि उत्पादन स्वदेशी आहे. या नवीन ‘यु’ सीरीजमध्ये ग्राहकाला वातानुकूलनाच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती डायकिन इंडियाचे उपाध्यक्ष (चॅनेल बिझनेस) नवनीत शर्मा (Navneet Sharma) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवनीत शर्मा म्हणाले, “ग्राहकांचा हवेचा दर्जा आणि आरोग्यावर अधिक भर असतो. त्यामुळे आम्ही पेटंटेड स्टीमर डिस्चार्ज तंत्रज्ञान ४-स्टार सेगमेन्टमध्ये आणले आहे. तसेच वाय-फाय असलेल्या उत्पादनांच्या ऑफर्स अपग्रेड केल्या आहेत. ड्यू क्लीन तंत्रज्ञानासह उत्पादनात आधुनिकीकरण (Advanced Technology) द्वारे शुद्ध हवा देण्याची बांधिलकी आम्ही जपली आहे. हे तंत्रज्ञान इनडोअर युनिट (आडीयू) वातावरणातील पाण्याने स्वंय-स्वच्छता करण्यासाठी सक्षम करून स्वच्छ आणि कार्यक्षम संचालनाची खात्री करते. १५० चौरस फुटांच्या जागेचा विचार करून डायकिन वातानुकूलकांची (एसी) ही नवीन श्रेणी प्रत्येक सामान्य माणसासाच्या वातानुकूलनाच्या आणि हवेच्या दर्जाचा गरजा पूर्ण करते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात व्यापक विद्युतीकरण झाल्यामुळे पर्यावरणपूरक वातानुकूलन (एसी) उपायांचा लाभ घेण्यासाठी, डायकिन एसी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.”
“डायकिन इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. जे. जावा यांच्या नेतृत्वात कंपनी प्रगतीची शिखरे गाठत आहे. येथे प्रत्येक भारतीयाची गरज पुरवणारी ‘मेक इन इंडिया’ उत्पादने तयार करण्याचे आमचे स्वप्न आहे. वातानुकूलित ही आता एक गरज बनल्यामुळे उदयोन्मुख ग्राहकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, उत्पादन नवकल्पना आणि गुणवत्ता यांच्यामध्ये एक मूलगामी बदल गरज होती. डायकिन वातानुकूलकांची नवीन श्रेणी अधिक ऊर्जा वापर शुल्काच्या भुर्दंडाशिवाय जुन्यापुराण्या, कालबाह्य तंत्रज्ञानाकडून अद्ययावत करण्यासाठी वाढत्या भारतीय लोकसंख्येला सक्षम करील,” असे नीरज शुक्ला यांनी सांगितले.
डायकिनच्या नव्या श्रेणीची वैशिष्ट्ये :
- १५% अधिक ऊर्जा कार्यक्षम
- स्वच्छ आणि कार्यक्षम आयडीयु ऑपरेशन साठी ड्यू क्लीन तंत्रज्ञान
- हवेच्या गुणवत्तेसाठी स्टीमर डिस्चार्ज तंत्रज्ञान
- देखरेखीसाठी तीन आयडीयु डिस्प्ले
-
सुलभ हाताळणीसाठी वायफाय संचालन
-
गरम आणि थंड होण्यासाठी कमी खर्चाचा हिट पंप
“डायकिन इंडियाने एसी आणि सुट्या भागांच्या उत्पादनासाठी श्री सिटी, आंध्रप्रदेश येथे १००० कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे उत्पादन क्षमता १२ लाख आरए युनिटवरून २५ लाख युनिटपर्यंत वाढेल. परिणामी, एचव्हीसी उपकरणांच्या निर्यातीत डायकिन भारतातून आघाडी घेईल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक आश्वासक पाऊल आहे. भारतात मोठी गुंतवणूक करणारी डायकिन ही जपानी कंपनी पहिली ठरली आहे. भारतातील मोठ्या संधींचा लाभ घेण्यासाठी मेक इन इंडियाच्या अंतर्गत काम करत आहे.” -
– नवनीत शर्मा, डायकिन इंडियाचे उपाध्यक्ष (चॅनेल बिझनेस)