‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्टतर्फे ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्टतर्फे ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजन ; जय गणेश रुग्णसेवा अभियान

पुणे, दि. २१ –  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन  (Shrimant Dagdusheth Halwai Public Ganapati Trust, Suvarnayug Tarun Mandal organize free health check-up camp for Warkaris who came to Pune  )      करण्यात आले होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयाेजित शिबिरात ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी  (Free health check-up of 11,764 Warkari in the camp )  करण्यात आली.

आरोग्य शिबिर उद्घाटनप्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने,  (Sunil Rasne, Chairman of Dagdusheth Ganapati Trust, inaugurated the health camp.)  कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार व सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमाेल केदारी तसेच मंडळाचे राहुल चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, तुषार रायकर, सनी सिद्धा, इंद्रजीत रायकर, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हे शिबिर घेण्यात आले.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून ट्रस्ट कार्यरत असून आराेग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.  (The trust operates under the motto “Service to patients is service to God” and health and eye check-up camps are conducted.)  या शिबिरात डाेळ्यांची तपासणी, चष्मेवाटपासह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आराेग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यांसारख्या आजारांवर मोफत औषधे देण्यात आली. तसेच फिजिओथेरपी देखील करून देण्यात येणार आहे.

शिबिरात २५ रुग्णालयातील ३७५ डाॅक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी भाग घेतला.  (Many volunteers, including 375 doctors from 25 hospitals, participated in the camp.)  दरम्यान, सकाळी १५ हजार वारकऱ्यांना नाश्ता व चहा व पाणी देण्यात आले. तसेच पुण्यात पालख्यांचे आगमन हाेताना मंदिरासमाेर पालख्यांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *