विकसित भारतासाठी ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण

विकसित भारतासाठी ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण

विकसित भारतासाठी ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे मत; ‘आयसीएमएआय’तर्फे ‘रिजनल प्रॅक्टिशनर्स कॉन्व्हेंशन २०२४’
 
पुणे : “देशातील विकासकामे करदात्यांच्या पैशांतून होत असतात. त्यामुळे कोणताही प्रकल्प राबविताना त्याचे सूक्ष्म आर्थिक नियोजन व प्रस्तावित खर्चाचा योग्य विनियोग कसा होईल, यावर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) काम करत असतो. विकसित भारताच्या वाटचालीत ‘सीएमए’चे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारशी संबंधित ‘सीएमए’च्या काही अडचणी असतील, तर त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल आणि आयसीएमएआय पुणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने ‘रिजनल प्रॅक्टिशनर्स कॉन्व्हेंशन २०२४’ व ‘रिजनल लेडी सीएमए कॉन्व्हेंशन २०२४’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. ‘लर्न, शेअर अँड नेटवर्किंग इज अ सक्सेस मंत्रा’ आणि ‘विकसित भारताच्या प्रगतीमध्ये महिलांच्या क्षमतांचा लाभ’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या.

कर्वेनगर येथील संस्थेच्या कार्यालयात ‘आयसीएमएआय’चे अध्यक्ष सीएमए अश्विन दलवाडी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘आयसीएमएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, उपाध्यक्ष सीएमए अरिंदम गोस्वामी, सचिव सीएमए मिहीर व्यास, खजिनदार नॅन्टी शहा, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, सीएमए डॉ. डी. व्ही. जोशी, सीएमए एम. के. आनंद, सीएमए अमित आपटे, सीएमए डॉ. संजय भार्गवे, सीएमए नीलेश केकाण, सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, सीएमए राहुल चिंचोलकर आदी उपस्थित होते.

सीएमए अश्विन दलवाडी म्हणाले, “संसदेच्या कायद्यांतर्गत स्थापित झालेली आयसीएमएआय ही एक प्रोफेशनल संस्था आहे. कॉस्ट अकाउंटन्सीच्या व्यवसायाचा प्रचार, नियमन आणि विकास करण्याचे काम होते. संस्था खर्चाची स्पर्धात्मकता, खर्च व्यवस्थापन, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि खर्च लेखाबाबत संरचित दृष्टीकोन याचा पाठपुरावा करते. सीएमए हे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्स, कर, मर्जर अँड अक्विजीशन, तसेच कॉस्ट ऑडिट अँड सर्टिफिकेशन आणि ऑडिट ऑफ कॉस्ट रेकॉर्ड्सच्या क्षेत्रात उद्योग आणि व्यवसायात कार्यरत असतात.”

सीएमए चैतन्य मोहरीर म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी सीएमए सर्वोत्तम पदवी असून व्यवसाय व नोकरीमध्ये उत्तम करियर करू शकतात. त्यामुळे सीएमए करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाधिक तरुणांनी सीएमएचा अभ्यास समजून घेऊन तयारी करावी. भारताच्या अर्थव्यवस्थेत व विकासात योगदान देण्याची ही नामी संधी आहे.”

सीएमए डॉ. डी. व्ही. जोशी यांचे बीजभाषण झाले. सीएमए नागेश भागणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीएमए नीलेश केकाण यांनी सूत्रसंचालन केले. सीएमए नॅन्टी शहा यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *