‘मराठ्यांचा दरारा’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, दि. २०- “सेनासाहेब सुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रामध्ये आणून आपल्या गौरवशाली इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका पार पाडली आहे. या तलवारीमुळे समाज इतिहासाशी अधिक घट्टपणे जोडला गेला आहे. नागपूरसह राज्यातील विविध ठिकाणी या तलवारीचे प्रदर्शन होणार असून, त्यामुळे हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास हा समृद्ध, पराक्रमी व गौरवशाली आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.(“The history of the Bhosale family of Nagpur is rich, mighty and glorious,” asserted Chief Minister Devendra Fadnavis)
श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रात परत आल्याच्या प्रीत्यर्थ राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी (krushna publications) कृष्णा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित, वा. गो. आपटे आणि यशोधन जोशी लिखित ‘मराठ्यांचा दरारा – नागपूरकर भोसलेंच्या बंगाल प्रांतावरील मोहिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार संजय उपाध्याय, आमदार श्रीकांत भारतीय, डॉ. किरण कुलकर्णी, मीनल जोगळेकर, पुस्तकाचे लेखक यशोधन जोशी, प्रकाशक चेतन कोळी आदी यावेळी उपस्थित होते.
(devendra fadnvis said)देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूरकर भोसले घराण्याचा हा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात या संदर्भातील अनेक उत्तम पुस्तके प्रकाशित होत आहेत हीदेखील महत्त्वाची बाब आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याचे कार्य सुरू झाल्याचे सांगत युनेस्को मान्यताप्राप्त १२ किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे अशा विविध ऐतिहासिक वारशांद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जात आहोत. हा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सांस्कृतिक विभागाचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचे आपले प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
(Yoshdhan joshi said)यशोधन जोशी म्हणाले, “इंदूरच्या वासुदेव गोविंद आपटे यांचे १९१६ साली प्रकाशित झालेले ‘मराठ्यांचा दरारा अथवा मराठ्यांच्या बंगाल प्रांतावर स्वाऱ्या’ हे पुस्तक मला सापडले. त्याचे संदर्भ चाळताना गंगाराम या कवीच्या ‘महाराष्ट्र पुराण’ या बंगाली काव्याचा १९६१ साली एडवर्ड डिमॉक आणि प्रतुलचंद्र गुप्त यांनी केलेला इंग्लिश अनुवाद वाचनात आला. या दोन्हीचा आधार घेत ‘मराठ्यांचा दरारा’ हे विस्मृतीत गेलेले पुस्तक पुन्हा एकदा वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकावर काम सुरू असतानाच मे २०२५ मध्ये सेनासाहेब सुभा रघुजी भोसले यांच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव होणार असल्याची बातमी आली आणि महाराष्ट्र शासनाने तत्काळ योग्य ती पावले उचलत ती तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणली. त्याच धर्तीवर हे पुस्तक नव्याने प्रकाशित होत आहे, हा एक विलक्षण योगायोग आहे.”
