पुणे, दि . २५ – मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशनसाठी (एमसीए) घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत पुण्याची साक्षी महाजन हिने ९९.९९ पर्सेंटाईल मिळवून देशात प्रथम (Sakshi Mahajan from Pune has topped the CET exam for Master of Computer Applications (MCA) by scoring 99.99 percentile, becoming the first in the country.) येण्याचा मान मिळवला आहे. साक्षीच्या या यशाबद्दल तिला प्रशिक्षण देणाऱ्या एनआर क्लासेसच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी साक्षीचे वडील डॉ. प्रवीण महाजन, आई प्रगती महाजन, एनआर क्लासेसचे संचालक प्रा. रामदास बिरादार व प्रा. नेहा बिरादार उपस्थित होते.
साक्षी महाजन पुण्यातील सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात बीएस्सी कम्प्युटर सायन्स (बीसीएस) शिकत होती. एनआर क्लासेसमध्ये साक्षी गेल्या दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. आई-वडिलांचे प्रोत्साहन, सूर्यदत्त महाविद्यालय व एनआर क्लासेसमधून मिळालेले योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करू शकले, असे साक्षी महाजन हिने नमूद केले. डॉ. प्रवीण महाजन यांनीही आपल्या मुलीच्या यशात या दोन्ही संस्थांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
(Ramdas birajdar said) रामदास बिरादार म्हणाले, “आयटी व कम्प्युटर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यावर आमचा भर आहे. साक्षीने मिळवलेले यश हे आमच्या प्रयत्नांचे फलित आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम शिकवण्यासह कौशल्ये, नवतंत्रज्ञानातील बदल अवगत करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमची विद्यार्थिनी देशात प्रथम आल्याचा अभिमान वाटतो.”