जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लबतर्फे जनजागृती व मृतांना श्रद्धांजली
पुणे, दि. १५ – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन केले होते. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कँडल मार्च ( This candle march is an initiative of Connecting Trust and Rotary Club of Pune Sarasbagh. ) संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता पुणे येथून निघून श्रेयस बँक्वेट, आपटे रस्ता येथे समाप्त झाला. या कँडल मार्चमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज या क्लबचे सहकार्य लाभले.
कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका अर्णवाज दमानिया, (Arnavaj Damania, Founder of Connecting Trust) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर, समन्वयक गायत्री दामले, विरेन राजपूत, रोटेरियन सुमेधा भोसले, रोटरी क्लब सारसबागचे आशुतोष वैद्य, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्षा मनिषा बेळगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या रुमा आगवेकर, मिडईस्टचे अध्यक्ष रोशन, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षा अलका ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष जीवराज चोले, रोटरॅक्टचे समन्वयक सुमित गीते आदी उपस्थित होते. श्रेयस बँक्वेट येथे आत्महत्या प्रतिबंध जागृती करणाऱ्या नाट्यछटांचे सादरीकरण झाले. जीवनातील अंधकार दूर करून आरोग्यदायी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारा हा कँडल मार्च होता.
(Arnwaj damaniya said)अर्णवाज दमानिया म्हणाल्या, “वीस वर्षांपूर्वी आत्महत्या प्रतिबंधासाठी काम सुरु केले, तेव्हा हा विषय निषिद्ध मानला जात होता. मात्र, आज आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याच्या या अभियानात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते, हे पाहून आनंद वाटतो. एकांत, शांतता ही मनाला खात असते. त्यामुळे संवाद करणे, एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. नैराश्य, दडपण, मानसिक कोंडी होत असेल, तर मन मोकळे करायला हवे. मनावर ओझे घेऊन जगत राहिलो, तर मनातील वाईट विचार प्रबळ होत जातात आणि आपण टोकाच्या विचारांकडे जातो.”
सुमेधा भोसले, अल्पना वैद्य यांनीही मनोगते व्यक्त केली. गायत्री दामले यांनी सुत्रसंचालन केले. मार्चमध्ये सहभागी स्वयंसेवकांनी हातामध्ये जनजागृतीपर फलक घेतले होते.