केडन्स, ब्रिलियंट्स, जिल्हा संघाची आगेकूच

केडन्स, ब्रिलियंट्स, जिल्हा संघाची आगेकूच

पुणे : केडन्स, ब्रिलियंट्स, जिल्हा संघांनी अनुक्रमे पूना क्लब, मेट्रो क्रिकेट क्लब व २२ यार्ड्स संघाला पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.

पूना क्लब मैदानवर झालेल्या केडन्स संघाने पुना क्लब संघाला ७ गडी राखून पराभूत केले. पूना क्लब संघाने ४३.५ षटकांत सर्वबाद १८२ धावा केल्या. लढतील पाऊस आल्याने केडन्स संघाला ४३ षटकांत १५८ धावांचे लक्ष्य मिळाले. या धावा केडन्स संघाने २८.५ षटकांत ३ गाड्यांच्या मोबदल्यात करताना विजय साकारला. ५ गडी बाद करणाऱ्या व ४८ धावांची दमदार खेळी करणाऱ्या आर्शिन कुलकर्णी याला सामनावीर घोषित करण्यात आले. 

 

येवलेवाडी येथील मैदानवर झालेल्या लढतीत ब्रिलियंट्स संघाने मेट्रो संघाला ८ गडी राखून पराभूत केले. मेट्रो संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०.२ षटकांत सर्वबाद १७५  धावंपर्यंत मजल मारली. मेट्रोच्या यश बर्गे यांने ५९ धावांची झुंजार खेळी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे ब्रिलियंट्स संघाला सुधारित आव्हान मिळाले. ब्रिलियंट्स संघाने २ बाद १३४ धावा, रोहन शिंदे (४५), आकाश पेडणेकर (नाबाद ३४) व अनुप भराडे (२३) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर २३.४ षटकांत पार करताना विजय मिळवला.  

बारणे अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत जिल्हा संघाने २२ यार्ड्स संघावर सरासरी धावसंख्येच्या जोरावर विजय मिळवला. पावसामुळे ४३ षटकांच्या  झालेल्या या लढतीत २२ यार्ड्स संघाने ९ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. यावेळी ओंकार पटकल याने भेदक गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले. जिल्हा संघाने ३७ षटकांत ७ बाद १४६ धावंपर्यंत मजल मारली. पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने जिल्हा संघाला सरस सरासरीच्या जोरावर विजयी घोषित करण्यात आले.

  
संक्षिप्त धावफलक :

पूना क्लब विरुद्ध केडन्स

पूना क्लब : ४३.५ षटकांत सर्वबाद १८२ (अशकन काझी ७६, ११ चौकार, वरद कुलकर्णी ३४, ५ चौकार, सागर मलपती १९, १ षटकार, आर्शिन कुलकर्णी ९.५-१-४६-५, शुभम खरात ८-०-३४-२, आर्य जाधव २-०-६-२) पराभूत वि केडन्स २८.५ षटकांत ३ बाद १६० (अनिरुद्ध साबळे ५७, ८ चौकार, आर्शिन कुलकर्णी ४८, ६ चौकार, प्रद्युम्न चव्हाण २२, ३ चौकार, अखिलेश गवळे ५-०-२०-२, अमन दोशी ५.५-०-४३-१) सामनावीर : आर्शिन कुलकर्णी

——- 

मेट्रो क्रिकेट क्लब विरुद्ध ब्रिलियंट्स

मेट्रो : ४०.२ षटकांत सर्व बाद १७५ (यश बर्गे ५९, ६ चौकार, ३ षटकार, नीरज जोशी ३६, ७ चौकार, चंद्रकांत सरोज २७, ५ चौकार, आर्य शहा ८.२-१-३५-४, प्रतीक भूईमकर ७-१-२७-२, उत्कर्ष चौधरी ९-२-३९-२) पराभूत वि ब्रिलियंट्स २३.४ षटकांत २ बाद १३४ (रोहन शिंदे ४५, ७ चौकार, २ षटकार, आकाश पेडणेकर ३४, ५ चौकार, अनुप भराडे २३, १ चौकार, १ षटकार, सार्थक वाळके ६.४-१-२२-१, यश बर्गे २-०-१०-१) सामनावीर : आर्य शहा (मेट्रो)

———–

२२ यार्ड्स विरुद्ध जिल्हा संघ 

२२ यार्ड्स : ४३ षटकांत ९ बाद १६४ (श्रेयस केळकर ४१, ५ चौकार, १ षटकार, गौरव कुमकर ३९, २ चौकार, १ षटकार, युवराज खाडे ३८, ३ चौकार, ओंकार पटकल ९-२-३४-४, कार्तिक भाल्लाय ९-१-४०-२ अभिषेक निषाद ७-१-२५-१, नचिकेत ठाकूर ९-२-२४-१) पराभूत वि जिल्हा संघ : ३७ षटकांत ७ बाद १४६ (सामेक जगताप ४०, ५ चौकार, किरण चोरमाले, ३१, ४ चौकार, अभिषेक पवार १८, २ चौकार, गौरव कुमकर ९-०-२४-२, ओजस पाटील ४-१-१२-१ हर्षवर्धन पाटील ६-०-२६-१) सामानावीर : ओंकार पटकल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *