नवतंत्रज्ञान, कौशल्य आत्मसात करीत स्वतःला अद्ययावत ठेवा –  सीए यशवंत कासार यांचा सल्ला

नवतंत्रज्ञान, कौशल्य आत्मसात करीत स्वतःला अद्ययावत ठेवा – सीए यशवंत कासार यांचा सल्ला

 ‘आयसीएआय’च्या दीक्षांत सोहळ्यात ९५० स्नातकांना पदवी प्रदान
 
शिकण्याची वृत्ती, कठोर परिश्रम, नैतिकता व समर्पण भाव सोडू नका
सीए शरद वझे यांचा सनदी लेखापालांना सल्ला; ‘आयसीएआय’च्या दीक्षांत सोहळ्यात ९५० स्नातकांना पदवी प्रदान

पुणे दि. २८ – ” शिक्षण ही अविरत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे विद्यार्थी बनून सतत नवनव्या गोष्टी शिकत राहाव्यात. नवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करीत स्वतःला अद्ययावत ठेवावे. सनदी लेखापाल ही पदवी मिळवणे मोठे यश आहे. पण त्यानंतरही शिकण्याची जिज्ञासा सोडू नये. करिअरमध्ये ‘स्पेशलायझेशन’ मिळवण्यासह सामाजिक कार्यातही योगदान द्यावे,” असे मत कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार  (Vice President of Cosmos Bank CA Yashwant Kasar)  यांनी व्यक्त केले.

 
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने आयोजित दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून यशवंत कासार बोलत होते. (Yashwant Kasar was speaking as the chief guest at the convocation ceremony organized by the Pune branch of The Institute of Chartered Accountants of India (ICAI).) बाणेर येथील बंटारा भवनमध्ये आयोजित सोहळ्यात कासार यांच्यासह ज्येष्ठ सनदी लेखापाल सीए शरद वझे यांच्या हस्ते ९५० पेक्षा अधिक स्नातकांना सीए (सनदी लेखापाल) पदवी प्रदान करण्यात आली. प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, विभागीय समिती सदस्य सीए अभिषेक धामणे, सीए राजेश अग्रवाल, ‘आयसीएआय पुणे’चे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके यांची, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम आदी उपस्थित होते.
 
(CA yashwant kasar)सीए यशवंत कासार यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, “कृत्रिम बुद्धिमतेसह नवनव्या तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होत आहे. समाजाच्या गरजेनुसार प्रत्येक व्यवसायाचे स्वरूप बदलत असून, सनदी लेखापालांनीही नवे कौशल्य आत्मसात करावीत. नेहमी शिकत राहावे. विश्लेषणात्मक दृष्टिकोन ही आपल्या व्यवसायाची मोठी ताकद आहे. उद्योगांच्या बदलत्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे.”
 
सीए शरद वझे म्हणाले, “तुम्ही आता व्यावसायिक जीवनाचा प्रारंभ करणार आहात. व्यावसायिक आयुष्यात तुम्ही प्रतिदिवशी काही ना काही शिकतच असता. त्यामुळे सतत शिकत राहा. आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये समर्पित भावनेने काम करा. करिअरला नैतिकतेची जोड द्या. कठोर परिश्रम, कौशल्य विकास, समर्पण आणि नैतिकता या गोष्टींना आयुष्यभर प्राधान्य द्यावे.”
सीए चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले की, “तुम्ही सारे नव्या युगाचे प्रतिनिधी आहात. सनदी लेखापाल म्हणून जागतिक पातळीवरील अनेक संधी तुमच्यासमोर आहेत. युरोप, कॅनडा, सिंगापूरसह सारे जग कामासाठी खुले आहे. भारतीय सनदी लेखापालांच्या दर्जाविषयी जगभरात अतिशय गौरवपूर्ण बोलले जाते. तो लौकिक कायम राखा. नवनव्या संधींचा लाभ घेत राहा.”
सीए उमेश शर्मा यांनी दर्जा, सातत्य आणि नैतिकता ही त्रिसूत्री जपण्याचे आवाहन केले. सीएची पदवी मिळणे, हा एक टप्पा आहे. खरी परीक्षा व्यावसायिक जीवनात असते. त्यामुळे अभ्यासाची सवय कायम ठेवा. कामातील अचूकता जपा. कृत्रिम बुद्धीमत्तेसह अन्य तांत्रिक, यांत्रिक कौशल्ये काळानुसार आत्मसात करा, असे शर्मा म्हणाले.

सीए चंद्रशेखर चितळे यांनी सर्व स्नातकांना शपथ दिली. सीए अभिषेक धामणे यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. सीए सचिन मिणियार यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सीए ऋतुजा कोठारी व सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए राजेश अग्रवाल व सीए नेहा फडके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *