पुणे – लातूर- किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या भीषण भूकंपाला ३० सप्टेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. भूकंपानंतर १२०० भूकंपग्रस्त अनाथ व बेघर विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) त्यांच्या शैक्षणिक पुनर्वसन केले. पुणे वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आणून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याचे मनस्वी समाधान वाटते असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केले.
या भूकंपग्रस्त माजी विद्यार्थ्यांशी थेट संवादाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भूतकाळातील कटू पण वर्तमानातील गोड आठवणींना उजाळा देताना सर्वांचे डोळे पाणावले होते. याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, बीजेएस शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, बीजेएस मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
३० वर्षांपूर्वी शैक्षणिक विद्यार्थी सध्या देश-विदेशात विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. आजपर्यंत बीजेएसच्या माध्यमातून जवळपास पाच हजार सातशे पेक्षा अधिक भूकंपग्रस्त,आदिवासी, कोरोनामुळे अनाथ,बेघर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन केले आहे.अशी माहिती शांतिलाल मुथ्था यांनी यावेळी दिली.
भूकंपानंतर संस्थेत दखल झालेले आणि आता विविध क्षेत्रात कार्यरत असलेले प्रत्यक्ष १७ आणि ऑनलाईन १७ माजी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी बाबासाहेब दूधभाते,पद्माकर गोरे,लिंबाजी परताळे उद्धव कदम,लक्ष्मण चव्हाण बालाजी ओवांडे आदींनी आठवणी कथन केल्या.