चिंचवड,दि. २४ -सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच वाल्हेकरवाडी, येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन (A massive blood donation camp was organized by Sant Nirankari Charitable Foundation, the social wing of Sant Nirankari Mission, at Walhekarwadi. ) रविवार, २२ जून २०२५ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनच्या १३० अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले.
या शिबिराचे उदघाटन श्री.ताराचंद करमचंदानी (झोनल प्रमुख, पुणे) यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये करण्यात आले होते त्यावेळी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार डॉक्टर रामचंद्र लाड यांनी व्यक्त केले.