पुणे, दि. ३० – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘युवा प्रेरणा संवाद’ (Yuva prerna sawand) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी (ता. ३०) दुपारी २.०० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने सकाळी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol), राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, (chandrkant patil) राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेचे आमदार व महासचिव विक्रांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे,भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी संपूर्ण भारतवर्षांत अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्याप्रमाणेच त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी औद्योगिक धोरण आखले, अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. यासह त्यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. त्यांचे हे कार्य व आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. अधिकाधिक युवकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (Anup More, State President of Bharatiya Janata Yuva Morcha) यांनी केले आहे.