पुणे: कोथरूड येथील नवा अंकुश सोसायटीमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्मार्ट पुणे फाऊंडेशन (SMART PUNE FOUNDATION) यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दोन होतकरू महिलांना अत्याधुनिक शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच कु. यशराज गंधार या खेळाडूला राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत सूपूर्त करण्यात आली.
या वेळी डॉ संदीप बुटाला (अध्यक्ष, स्मार्ट पुणे फाऊंडेशन, पुणे ) संदीप खर्डेकर ( प्रवक्ता भाजप पुणे ) पुनीत जोशी आदी मान्यवर य वेळी उपस्थित होते.
समाजातील होतकरू आणि गरज असलेल्या महिलांना शिलाई मशीन चे वाटप करून स्मार्ट फौंडेशन ने उत्तम कार्य केले आहे..आपल्या महिला या स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे..समाजातील प्रत्येक नागरिकांना आपण मदत केली पाहिजे…भाजपा ने कोविड च्या काळात नागरिकांची मदत केली आहे..त्या प्रमाणे संदीप बुटाला यांनी दोन महिलांना मदत केली आहे..समाजातील जात पात नष्ट झाली पाहिजे…असे मत यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.