सहकार भारतीच्या साखर कारखाना प्रकोष्ठ जिल्हा प्रमुखपदी भाऊसाहेब आव्हाळे यांची निवड

सहकार भारतीच्या साखर कारखाना प्रकोष्ठ जिल्हा प्रमुखपदी भाऊसाहेब आव्हाळे यांची निवड

 
पुणे, दि. २० –  सहकार भारतीच्या पुणे जिल्हा साखर कारखाना प्रमुख प्रकोष्ठ प्रमुखपदी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे कृषिनाथ ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब आव्हाळे यांची निवड  (Bhausaheb Awhale, Director of Krishnath Green Energy Sugar Factory in Parner, Ahilyanagar district, has been appointed as the Head of Sahakar Bharti’s Pune District Sugar Factory Head Cell. ) झाली आहे. आळंदी येथे नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अभ्यासवर्गावेळी सहकार भारतीचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी पुणे जिल्ह्याची कार्यकारीणी घोषित केली.
 
सहकार भारती ही १९७८ मध्ये सहकार क्षेत्राच्या उत्थानासाठी स्थापन झालेली संस्था असून गेली ४४ वर्षे या संस्थेचे संपूर्ण देशभरातील पाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रभावीपणे व अविरतपणे कार्य सुरू आहे. सहकार खऱ्या अर्थाने यशस्वी व कार्यान्वित व्हावयाचा असेल, तर त्यातील काम करणारे सर्वच लहान-थोर कार्यकर्ते हे नि:स्वार्थी आणि समाजसेवी वृत्तीचे असले पाहिजेत म्हणून सहकार भारतीने ‘बिना सहकार नही उद्धार’ या ध्येयवाक्याला ‘बिना संस्कार नही सहकार’ अशी अर्थपूर्ण जोड दिली आहे, असे गिरीश भवाळकर यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांच्या हस्ते भाऊसाहेब आव्हाळे यांना जिल्हा प्रकोष्ठ प्रमुख, तर सहप्रकोष्ठ प्रमुख म्हणून माजी कार्यकारी संचालक अनंत निकम यांना पत्र दिले. सर्वांचे मार्गदर्शन व अनुभवाची जोड यातून सहकार भारतीद्वारा सहकारी साखर कारखान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी भावना भाऊसाहेब आव्हाळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *