तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलजीवन अभियान अधिक प्रभावी होईल – इंजि. वैशाली आवटे

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलजीवन अभियान अधिक प्रभावी होईल – इंजि. वैशाली आवटे

 
इंडियन वाॅटर वर्क असोसिएशन पुणे शाखेतर्फे ‘अभियंता दिवस’ साजरा
 

पुणे, दि. १८ –  “आज प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. जलजीवन मिशनमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्यांपर्यंत पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे पोहोचवून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी मदत होईल,” असे प्रतिपादन इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) अध्यक्षा इंजि. वैशाली आवटे  (Indian Water Works Association (IWA) President Eng. Vaishali Awate)    यांनी केले.

पुणे कॅंटोन्मेंट येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित ‘अभियंता दिवस’  (‘Engineer’s Day’ organized at the Maharashtra Life Authority auditorium in Pune Cantonment )  कार्यक्रमावेळी व्हाईटलेन्ड इंजीनियरिंग टेक्नोलाॅजीचे धवल ठक्कर, प्रकाश राव, हरेश पिल्ले, शहर अभियंता इंजि. नंदकिशोर जगताप, ‘आयवा’ पुणेचे सचिव दयानंद पानसे, सहसचिव भांडेकर, खजिनदार अनिल पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अभियंते आदी उपस्थित होते.

(Eng. Vaishali Awate said) इंजि. वैशाली आवटे म्हणाल्या, “पाण्याशी संबंधीत शासकीय योजना राबवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, त्याबद्दल अद्ययावत मार्गदर्शन मिळावे, तांत्रिक बाबींची माहिती मिळावी या उद्देशाने असे कार्यक्रम व्हावेत.”

धवल ठक्कर यांचे ‘मायक्रो टनलिंग बाय बोअरींग मेथड’ यावर सादरीकरण व मार्गदर्शन केले. खड्डेविरहित जमिनीवर काम करता यावे, यासाठी गायडेड बोअरींग मेथडचा वापर केला जातो. हॅमरच्या सहाय्याने खडकाळ जमिनीवर पाण्याच्या योजना राबवताना पाईपलाईन टाकण्यासाठी, कमी जागेत लोकांना त्रास न होता या तंत्रज्ञानाचा वापर उपयोगी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

इंजि. प्रकाश राव व ईंजि हरेश पिललेई यांनी ओपीव्हीसी पाईपच्या वापराबाबत माहिती देत त्याचे होणारे फायदे याबद्दल माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता मोहीम कार्यक्रमातील पारितोषिक विजेत्यांचा, नवनिर्वाचित व पदोन्नती मिळालेल्या अभियंत्याचा सत्कार करण्यात आला. 

 
इंजि. दयानंद पानसे यांनी १५ सप्टेंबरला भारतरत्न विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिवसाची माहिती दिली. इंजि. माधवी गरूड यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *