स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, इंदिराजींच्या पुण्यतिथीनिमित्त ७५ रणरागिनींना ‘सूर्य-सिद्धी एक्सलन्स अवार्ड २०२१’ प्रदान

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, इंदिराजींच्या पुण्यतिथीनिमित्त ७५ रणरागिनींना ‘सूर्य-सिद्धी एक्सलन्स अवार्ड २०२१’ प्रदान

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन व सिद्धी फाउंडेशनतर्फे राष्ट्राला व इंदिराजींना अनोखे अभिवादन
 
स्वतःचे अस्तित्व जपत महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे
सुषमा चोरडिया यांचे प्रतिपादन; ७५ महिलांना ‘सूर्य-सिद्धी एक्सलन्स अवार्ड २०२१’ प्रदान
 
इंदिराजींचे कर्तृत्व, व्यक्तिमत्व, बलिदान प्रेरणादायी
संगीता तिवारी यांचे प्रतिपादन; इंदिराजींच्या आदर्शातून भारतात घडाव्यात ‘आयर्न लेडी’
 
राष्ट्राला, महान व्यक्तींना अभिवादन करण्याची ‘सूर्यदत्ता’ची अनोखी परंपरा
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे मत; सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन व सिद्धी फाउंडेशनतर्फे ७५ महिलांना ‘सूर्य-सिद्धी एक्सलन्स अवार्ड २०२१’
 

पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्ता वुमेन एम्पॉवरमेंट अँड लीडरशिप अकॅडमी (स्वेला) आणि सिद्धी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुर्य-सिद्धी एक्सलन्स अवॉर्ड-२०२१’ सोहळ्याचे आयोजन केले होते. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अँड वेलनेस व सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांचे सहकार्य या सोहळ्यासाठी लाभले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व इंदिराजींची पुण्यतिथी याचे औचित्य साधून एकूण ७५ हा महिलांना हा पुरस्कार प्रदान करत अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

 

सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमधील सूर्यशक्ती भवनमध्ये झालेल्या या सोहळ्यावेळी पुणे शहर काँग्रेसच्या महासचिव संगीता तिवारी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सिद्धी फाउंडेशनचे समीर खिरीड, अमिताभ बच्चन यांची छबी लाभलेले पुण्यातील शशिकांत पेडवळ आदी उपस्थित होते. सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ७५ महिलांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून, इतर रेकॉर्ड बुकनाही प्रस्ताव पाठवले आहेत.
 
यावेळी पुरस्कारार्थी महिलांनी रॅम्पवॉक करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. रॅम्पवॉकवर उत्स्फूर्त चालणाऱ्या महिलांची निवड करत ‘मिसेस सूर्यदत्ता’ हा किताब देण्यात आला. दिल्ली, गुजरात, गोवा, झारखंड, आसाम अशा विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महिला होत्या. ज्युरी म्हणून तृषाली जाधव, नुपूर पिट्टी, सोमय्या पठाण, पूजा विश्वकर्मा यांनी निरीक्षण करत प्रोत्साहित केले. यावेळी विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महिलांनी भारताच्या नकाशाच्या प्रतिमेभोवती तिरंगा ध्वज हातात धरून, तिरंगी उपरणे गळ्यात घालून उभे राहत हम होंगे कामयाब गीताचे गायन करत अनोखी मानवंदना दिली.
संगीता तिवारी म्हणाल्या, “इंदिराजींच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम होतोय याचा मनस्वी आनंद वाटतो. महिला घर, मुले सांभाळून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बहुआयामी असलेल्या महिला अबला असूच शकत नाहीत. दुर्गा, अन्नपूर्णा, काली, लक्ष्मी अशी विविध रुपे तिची आहेत. ती जितकी सहनशील असते, तितकीच धाडसी, जिद्दी असते. इंदिराजींचे बलिदान, त्यांचे कर्तृत्व व व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. इंदिराजी, राजीवजी यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःच्या प्रतिमेचे बनवलेले वलय आदर्शवत होते. इंदिराजींच्या आदर्शांतून भारतात अनेक आयर्न लेडी घडाव्यात.”
 
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “महिला सक्षमीकरणासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने कायमच पुढाकार घेतला आहे. दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘स्वेला’चे व्यासपीठ आहे. उल्लेखनीय काम करून समाजाच्या उत्थानात योगदान देणाऱ्या या महिलांना आज सन्मानित करताना आमचाच सन्मान होत असल्याची भावना मनात आहे. संस्थेच्या विविध महाविद्यालयातील, विभागातील मुलींना आपल्यासारख्या आदर्शवत महिलांचे कार्य जाणून घेता यावे, या उद्देशाने असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. राष्ट्राला, महान व्यक्तींना अभिवादन करण्याची ‘सूर्यदत्ता’ची अनोखी परंपरा आहे.”
 
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “प्रत्येक महिलेला एक स्वतंत्र अस्तित्व असते. आपल्यातील कलागुणांना वाव देत स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे असते. या प्रवासात आपल्या पतीसह कुटुंबाची साथ मोलाची असते. सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत मुलांवरही तसेच संस्कार करून महिलांप्रती आदरभाव जोपासण्याची शिकवण दिली जाते. इंदिराजींचे कार्य नव्या पिढीसमोर यायला हवे. आपल्या प्रत्येकीमध्ये दुर्गेची प्रतिमा असते. आपल्याला तिला जागृत ठेवता आले पाहिजे.”
 
समीर खिरीड म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेने हे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिले, ही आनंदाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करत असलेल्या महिलांना शोधून त्यांना सन्मानित करण्याचे काम त्यामुळे अधिक सोपे झाले. आपल्या कामातून समाजाचे हित साधले जावे, यावर आपण लक्ष दिले पाहिजे.”
 
सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुनील धाडीवाल, रोशनी जैन, सोनाली ससार, डॉ. सायली अथनीकर, नयना गोडांबे, अभिश्री मोर, रोहित संचेती, बाटू पाटील, रोहन जमदाडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *