जनतेच्या सेवेसाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार शेखर निकम
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील असुर्डे पाष्टेवाडी येथे आमदार श्री.शेखरजी निकम सर यांच्या जिल्हा वार्षिक अतिवृष्टी योजना आणि डोंगरी विकास योजना निधीतून होणाऱ्या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला.वाडीतील ज्येष्ठ नागरिक श्री.शंकर आप्पा पाष्टे यांच्या हस्ते नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर गावाचे सरपंच श्री.पंकज साळवी,माजी उपसरपंच श्री.महेंद्र नरोटे,श्री.सुधीर सावर्डेकर,कोकरे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष श्री.संजय कदम यांनी नारळ वाढवत ग्रामविकासाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता झाली.यांच्या हस्ते कामाचे औपचारिक उदघाटन झाले,ज्यामुळे पाष्टेवाडीतील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीची पूर्तता झाली.
आताच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार शेखर निकम यांना कोकरे जिल्हा परिषद गटात मताधिक्य देत विजयात मोलाचा वाटा उचलत खंबीर साथ दिली आहे.याचा आमदार श्री.शेखर निकम यांनी ब-याच ठिकाणी अभिमानाने उल्लेख केला आहे.”जनतेच्या सेवेसाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या आमदार श्री.शेखर निकम सर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार,” असा ग्रामस्थांनी शब्द दिला.या कामामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला हा उपक्रम ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा ठरला आहे.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्यकारिणी सहसचिव सुधीर राजेशिर्के,तंटामुक्ती अध्यक्ष निलेश खापरे,उद्धव साळवी गुरुजी,पाष्टेवाडी अध्यक्ष मनोहर भाऊ पाष्टे यांच्यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये यशवंत पाष्टे,अरुण पाष्टे,रघुनाथ पाष्टे,संजय पाष्टे,अनिल पाष्टे,रोशन पाष्टे,प्रकाश पाष्टे,सुरेश निर्मळ यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.