पुणे, दि. २३- संसदीय कायद्यान्वये स्थापित दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्यातील नामवंत सीएमए नीरज जोशी यांची निवड झाली (Renowned CMA Neeraj Joshi from Pune was elected as the National Vice President. )आहे. ही निवड २०२५-२६ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी सीएमए टी. सी. ए. श्रीनिवास प्रसाद यांची निवड झाली आहे.
सीएमए नीरज जोशी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘आयसीएमएआय’च्या पश्चिम विभागीय समितीचे खजिनदार सीएमए चैतन्य मोहरीर, तसेच पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए रा हुल चिंचोळकर, सचिव सीएमए हिमांशू दवे, खजिनदार सीमए तनुजा मंत्रवादी यांच्यासह व्यवस्थापन समिती सदस्यांनी आनंद व्यक्त करत सीएमए नीरज जोशी यांचे अभिनंदन केले.
सीएमए नीरज जोशी हे सध्या ‘आयसीएमएआय’च्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. (CMA Neeraj Joshi is currently the Central Executive Member of ICMAI.) त्यांनी याआधी वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी), तसेच कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्डच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळली आहे. पुण्यातील नामांकित ‘धनंजय व्ही. जोशी अँड असोसिएट्स’ या फर्मचे ते भागीदार आहेत.
सीएमए नीरज जोशी म्हणाले, “दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब आहे. संस्थेच्या सशक्त भविष्यासाठी आणि व्यवसायातील नवनवीन संधींना दिशा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सीएमए सदस्य, तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी येणाऱ्या वर्षात विविध उपक्रमांचे, राष्ट्रीय परिषद व कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर पुण्याचे प्रतिनिधित्व करत असल्याचा आनंद आहे.”
‘आयसीएमएआय’विषयी:
दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) ही संस्था संसदेच्या अधिनियमांतर्गत व भारत सरकारच्या कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स कायदा, १९५९ अंतर्गत स्थापन झालेली एकमेव अधिकृत संस्था आहे. देशातील कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग व्यवसायाचे नियमन करते. संस्थेचे मुख्यालय नोएडा (उत्तर प्रदेश) येथे असून, देशभरात प्रादेशिक कार्यालये, अध्यापन केंद्रे आणि अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाखा कार्यरत आहेत. एक लाखाहून अधिक सदस्य आणि विद्यार्थी असून, उत्पादन, सेवा, सरकारी आणि खासगी क्षेत्रात आर्थिक शिस्त, खर्च नियंत्रण, धोरण आखणी, तसेच डिजिटल व्यवस्थापन प्रणालींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.