राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीमध्ये ‘त्रिशरण’चे प्रशांत वाघमारे यांची निवड

राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीमध्ये ‘त्रिशरण’चे प्रशांत वाघमारे यांची निवड

 

पुणे, दि. १७- महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद आणि प्रादेशिक संचालनालयाच्या ‘दीनदयाल जनआवास योजना-शहरी विभाग’ अंतर्गत राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीमध्ये पुण्यातील त्रिशरण एनलायटन्मेन्ट फाउंडेशनचे राज्य व्यवस्थापक प्रशांत वाघमारे यांची निवड  (Prashant Waghmare, State Manager of Trisharan Enlightenment Foundation, Pune, elected to the State Level Shelter Monitoring Committee under ‘Deendayal Jan Awas Yojana-Urban Division’  )   झाली आहे.

‘त्रिशरण’च्या माध्यमातून प्रशांत वाघमारे यांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये बेघर निवारा केंद्रांचे अत्यंत अचूक आणि पारदर्शक निरीक्षण यशस्वीपणे पार पाडले. त्यांच्या असाधारण नेतृत्व आणि प्रामाणिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेल्या ८७ बेघर निवारा केंद्रांच्या सुधारणेसाठी आणि व्यवस्थापनासाठी त्यांचा हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या समितीतील त्यांचा सहभाग राज्यातील बेघरांसाठीच्या निवारा योजनेच्या अंमलबजावणीला नवा आयाम देणार असून, सुधारित सुविधा आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या दिशेने मोलाचा हातभार लावेल. ही निवड सामाजिक सेवेत एक प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *