मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती

पुणे/मुंबई, दि. १५- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची राज्य सरकारच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  (Kaustubh Dhavase, Officer on Special Duty to Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, has been appointed as the Chief Advisor on Investment and Policy to the state government. )  सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

धवसे यांच्यावर आता चार प्रमुख क्षेत्रांमध्ये राज्याच्या धोरणात्मक वाटचालीसाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये गुंतवणूक प्रोत्साहन व धोरण निर्माण, थेट विदेशी गुंतवणूक सुलभीकरण, पायाभूत प्रकल्पांचे ‘वॉर रूम’ समन्वय आणि मोठ्या प्रमाणातील आयटी उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक बळकटी
धवसे यांची ही नियुक्ती राज्य सरकारच्या जागतिक गुंतवणूक आकर्षण, वेगवान पायाभूत प्रकल्प राबविणे व डिजिटल युगातील प्रशासकीय रूपांतरणासाठीचे प्रयत्न अधिक गतिमान करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या धोरण मंडळातील विश्वासू सदस्य असलेल्या धवसे यांची नियुक्ती राज्याच्या आर्थिक विकासाला नवे आयाम देण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(The appointment of Dhavase, a trusted member of the Chief Minister’s Policy Council, will be significant in giving a new dimension to the state’s economic development.)

जागतिक स्तरावरील धोरणात्मक अनुभव

धवसे यांना दोन दशकांहून अधिक काळ स्ट्रॅटेजी, कन्सल्टिंग व टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनुभव असून, त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे.

मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी एस. पी. जैन व्यवस्थापन संस्था येथून एमबीए ही पदवी प्राप्त केली. तसेच हार्वर्ड विद्यापीठाच्या जॉन एफ. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

राज्याच्या आर्थिक व्हिजनला जागतिक गुंतवणूक प्रवाहाशी सुसंगत करण्यासाठी व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी धवसे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.

_”ही नवी जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जागतिक भागीदारी, धोरणात्मक गुंतवणूक आणि परिवर्तनशील आयटी प्रकल्प राबविण्यास मी कटिबद्ध आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.”_
– कौस्तुभ धवसे,
मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *