चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी माणुसकी जपायला हवी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; गुरुपौर्णिमेनिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे गुरुजनांचा सन्मान

चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी माणुसकी जपायला हवी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; गुरुपौर्णिमेनिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे गुरुजनांचा सन्मान

समाज घडवणाऱ्या गुरुजनांचा सन्मान प्रेरणादायक 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; गुरुपौर्णिमेनिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे गुरुजनांचा सन्मान
 
पुणे, दि. ११-  गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने गुरुजनांचा सन्मान (  On the occasion of Guru Purnima, Suryadatta Education Foundation honors Gurus)  करण्यात आला. यामध्ये निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले (सूर्यदत्त ग्लोबल श्रेष्ठ सैनिक पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (सूर्यदत्त ग्लोबल साहित्य रत्न पुरस्कार), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे (सूर्यदत्त ग्लोबल राष्ट्रसेवा पुरस्कार), ‘एमआयटी’चे अधिष्ठाता डॉ. शरदचंद्र दराडे (सूर्यदत्त ग्लोबल गुरुवर्य पुरस्कार), जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा (सूर्यदत्त ग्लोबल रिसर्च अँड एक्सलन्स पुरस्कार), माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर (सूर्यदत्त ग्लोबल टेक्नोगुरु पुरस्कार), आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या योगगुरू राखी गुगळे (सूर्यदत्त ग्लोबल योगगुरू पुरस्कार), शिवशक्ती भवनच्या संचालिका राजयोगिनी बीके लक्ष्मी दीदी (सूर्यदत्त ग्लोबल शांतिदूत पुरस्कार), श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे पुजारी श्रीकांत महाराज देशमुख (सूर्यदत्त ग्लोबल पुरोहित रत्न पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, पदक, शॉल, ‘सूर्यदत्त’चा स्कार्फ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सूर्यदत्त संस्थेच्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात हा कार्यक्रम झाला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया,  (Founder President of Suryadutt Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia, Vice President Sushma Chordia )  सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्यासह ‘सूर्यदत्त’ संस्थेतील सर्व विभागांचे प्राचार्य, प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूर्यदत्त परिसरात सर्व गुरुजनांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल व ऑपरेशन्स अँड रिलेशन्स व्यवस्थापक स्वप्नाली कोगजे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. सोनाली ससार, सिद्धी खळे, साजिरी रानवडे व गौरी देशपांडे यांनी गणेशवंदना सादर केली.

(Prof. Dr. Sanjay b. Chordiya said)प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “गुरूचे स्थान आपल्या मनात सर्वोच्च आहे. जीवन घडवणाऱ्या गुरुजनांविषयी सदैव आदर, सन्मान आणि कृतज्ञता बाळगली पाहिजे. आजचा सोहळा गुरूंचा आशीर्वाद घेण्याचा असून, योगगुरू राखी गुगळे यांच्या प्रबोधनपर योगसत्राने वातावरण शांत, सकारात्मक व चिंतनशील झाल्याची अनुभूती आली. विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून सूर्यदत्त दरवर्षी विद्यार्थ्यांपुढे चांगला आदर्श ठेवत आहे. गुरुपौर्णिमा उत्सव हा भारतीय संस्कृती, मूल्ये आणि सर्वांगीण शिक्षण यांचा सुंदर संगम आहे. जागतिक स्तरावरील सुजाण, जबाबदार नागरिक घडवण्याच्या संस्थेच्या बांधिलकीला यामुळे नवसंजीवनी मिळाली.”

भूषण गोखले म्हणाले, “ज्या क्षेत्रात आपण काम करतो, त्या क्षेत्रात उच्च दर्जावर जाऊन समाजसेवा करत राहावी. देशभक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. ते विसरता कामा नये. आयुष्यात आपण प्रत्येकाकडून काहीतरी शिकत असतो. त्या अज्ञात गुरूचा सन्मान करायला हवा. हीच शिकवण सूर्यदत्तमध्ये दिली जातेय, याचा आनंद आहे.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “सगळ्यांनी माणूस म्हणून जगायला पाहिजे. मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्याने नेहमी शिकत राहीले पाहिजे.  (Man is a student throughout his life. He must always keep learning. )  त्याचबरोबर आपल्यातली माणुसकी जपली पाहिजे. त्यातूनच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते. सूर्यदत्त संस्था अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करीत आहे.”
गिरीश प्रभुणे म्हणाले, “प्रत्येकावर तीन ऋण असतात. माता-पिता, गुरु व समाजाचे ऋण घेऊनच आपण घडत असतो. यात समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे. देशासाठी व समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला अधिक समृद्ध करत जाते.”
आयुष्यात योग अतिशय महत्वाचा आहे. कितीही वय असो सगळ्यांनी कायम योग केला पाहिजे. आजवर अनेक राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण आज गुरु म्हणून सूर्यदत्त संस्थेने केलेल्या सन्मानाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे राखी गुगळे यांनी नमूद केले.
बीके लक्ष्मी दीदी म्हणाल्या, “या आधुनिक जगात सामाजिक विषमता खूप वाढत चालली आहे. स्पर्धेच्या या युगात सामाजिक अडी मनातून काढून सगळ्यांनी जात धर्म विसरून एकोप्याने राहवे. सगळ्यांनी शांततेचा मार्ग निवडून स्वतःच्या व समाजाच्या हिताकडे लक्ष केंद्रित करावे.”

डॉ. दीपक शिकारपूर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आर्टिफिशिअल इंटीलिजन्सच्या बरोबरीने स्वतःच्या कौशल्यावर लक्ष द्यावे. वेगवेगळ्या भाषा शिकून स्वतःला अद्ययावत ठेवावे. जपानी भाषा शिकल्यास असंख्य संधी आहेत. काळाची गरज स्वतःला बदलत ठेवावे.”

डॉ. विनोद शहा म्हणाले, “आपले आई-वडील हे आपले गुरु असतात, हे न विसरता कायम त्यांचा आदर करायला हवा. त्यांना कधीही दुखावू नये. आजच्या युवा पिढीने कितीही पुढे गेले तरी आई-वडील व गुरु यांचे स्थान आदराचे ठेवावे.”

श्रीकांत देशमुख म्हणाले, “सगळ्यांमध्ये चांगले व वाईट दोन्ही गुण असतात. वाईट गुणांवर मात करून चांगल्या गुणांवर लक्ष द्या. समाज हा निर्व्यसनी निरोगी व सक्षम राहावा, अशीच प्रार्थना रोज दगडूशेठ गणपतीकडे करत असतो.”
आपला विद्यार्थी आज एक महाविद्यालय घडवतोय व अनेक पिढ्या उत्तम घडवण्याचे पुण्याचे काम करतोय, ही एका गुरु साठी अभिमानाची गोष्ट असल्याची भावना प्रा. शरदचंद्र दराडे यांनी व्यक्त केली.
प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी प्रत्येक प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर स्वतःचे मनोगत व्यक्त केले व जुन्या आठवणींना रम्य उजाळा दिला.
सुषमा चोरडिया यांनी ‘पालक हेच तुमचे पहिले गुरू आहेत. त्यांचे नेहमी ऐकावे. जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक गुरूविषयी श्रद्धा आणि आदर ठेवावा’ असा संदेश दिला. स्वागत-प्रास्ताविक स्नेहल नवलखा यांनी केले.
डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. ऑपरेशन्स अँड रिलेशन्स मॅनेजर स्वप्नाली कोगजे, मोनिका सेहरावत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *